नांदेडमध्ये मोठी कारवाई; 25 तलवारींसह दोन जण ताब्यात

नांदेड मध्ये पोलिसांची मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी एका रिक्षामधून 25 तलवारी जप्त केल्या आहेत.
नांदेडमध्ये मोठी कारवाई; 25 तलवारींसह दोन जण ताब्यात
Swordsसंतोष जोशी

संतोष जोशी

नांदेड : जिल्ह्यात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी एका रिक्षामधून 25 तलवारी जप्त केल्या आहेत. शिवाजीनगर पोलिसांनी गोकुळनगर भागात आज ही कारवाई केली आहे. एवढ्या मोठ्याप्रमाणात तलावरीचा सापडल्याने नांदेडमध्ये खळबळ उडाली आहे. (Nanded 25 Swords Found)

रेल्वे स्टेशनवरुन जात असलेल्या रिक्षाचा पोलिसांना संशय आल्याने पोलिसांनी रिक्षेची झडती घेतली. झडतीमध्ये तब्बल 25 तलवारी सापडल्या. याप्रकरणी पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतले आहे. तर, शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Swords
पती-पत्नी अन् बेस्ट फ्रेंड! 'त्या' एका कृत्याने तुटली 13 वर्षांची मैत्री...

शहरात सध्या गुन्हेगारीने डोके वर काढले आहे. पोलिसांच्या शोध मोहिमेत बंदुकी आणि घातकशस्त्र सापडत आहेत मात्र, एवढा मोठा तलवारीचा साठा पहिल्याच पोलिसांच्या हाती लागला आहे..

हे देखील पहा-

दरम्यान, आतापर्यंत पोलिसांनी टाकलेल्या धाडीत पुणे, धुळे, नांदेड, औरंगाबाद अशा अनेक ठिकाणाहून तलवारी जप्त केल्या आहेत. त्यामुळे पोलिसांची डोकेदुखी आता वाढली आहे. राज्यात एवढ्या मोठ्या संख्येने तलवारी राज्यात का येत आहेत? की कुणाचा मोठी हिंसा भडकवण्याचा प्रयत्न आहे? यामार्फत गुंडांकडून दहशत माजवण्यासाठी असे प्रयत्न सुरु आहेत याचा शोध सध्या पोलीस घेत आहे. मात्र रोज तलवारी पकडल्या जाऊ लागल्याने आता हे थांबवण्याचे आव्हानही पोलिसांसमोर उभे आहे. आतापर्यंत बहुतांश आलेल्या तलवारी या पंजाबमधून (Punjab) आल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे पोलिसांच्या कारवाईत या तलवारींचे पंजाब कनेक्शन सापडत का पाहावं लागणार आहे. परंतु पोलीस त्याच्या मुळापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com