Makar Sankranti: देहुसह पंढरपुर मंदिर समितीने घेतला महत्वपुर्ण निर्णय

कोरोनाचा प्रसार वाढू नये यासाठी देहूत खबरदारी घेण्यास प्रारंभ झाला आहे.
dehu & pandharpur
dehu & pandharpursaam tv

मावळ : देहूतील जगतगुरु संत तुकाराम महाराजांचे श्रीक्षेत्र देहू मंदिर मकर संक्रांतीला पंधरा तास बंद राहणार आहे. चौदा जानेवारीस मकर संक्रातीचे औचित्य साधून महिला वर्ग विठ्ठल रुक्मिणी आणि जगतगुरु संत तुकाराम महाराज यांना वाणवसा वाहण्यासाठी देहूच्या मुख्य मंदिरात येतात.

dehu & pandharpur
BJP: १२ आमदारांचे निलंबन; 'हकालपट्टीपेक्षा वाईट; मतदारसंघास शिक्षा' Supreme Court चे निरीक्षण

राज्यातील कानाकोपऱ्यातून भाविक देखील देहू (dehu) आळंदीला दर्शनासाठी गर्दी करतात. या गर्दीने कोरोनाचा (corona) प्रादुर्भाव वाढू शकतो तसेच राज्यात पुन्हा पसरू शकतो. यामुळे चौदा जानेवारीच्या पहाटे पाच पासून ते रात्री आठ वाजेपर्यंत मंदिर बंद ठेवण्यात येणार असल्याचा निर्णय देहू देवस्थानने घेतला आहे. या निर्णयाची माहिती संजय महाराज मोरे (विस्वस्थ देहू देवस्थान) यांनी दिली.

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर राहणार खूले

पंढरपूर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीची बैठक आज झाली. या बैठकीत मकर संक्रांत काळात विठ्ठल रुक्मिणी मंदिर दर्शनासाठी खूले ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोना नियमांचे पालन करून भाविकांना दर्शनाचा लाभ घेता येणार आहे.

आठ हजार भाविकांना दर्शन मिळेल

साधारणत आठ हजार भाविकांना दर्शन देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. मकर संक्रांती दिवशी मंदिर परिसरात महिलांना वाण वसा करण्यास परवानगी देण्यात येणार आहे. विठुरायाला दान मिळालेल्या 28 किलो सोने वितळवून वीटा तयार करून एसबीआय बॅंकेत ठेवण्याचा निर्णय देखील आजच्या बैठकीत झाला. या बराेबरच मंदिर विकास आराखड्याचा डीपीआर शासनाकडे मंजुरीसाठी लवकरच पाठवणार असल्याचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी माहिती दिली.

edited by : siddharth latkar

dehu & pandharpur
New York: अग्नीतांडवातून वाचले बाळ; आईच्या कुशीत जाताच दिली गाेड स्माईल

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com