औसा लातूर महामार्गावरील एका बाजूचा रस्ता वाहतुकीसाठी मोकळा करा - डॉ. अफसर शेख

या महामार्गावर अपघात होऊन अनेकांचे बळी गेले आहेत.
औसा लातूर महामार्गावरील एका बाजूचा रस्ता वाहतुकीसाठी मोकळा करा - डॉ. अफसर शेख
औसा लातूर महामार्गावरील एका बाजूचा रस्ता वाहतुकीसाठी मोकळा करा - डॉ. अफसर शेखदीपक क्षीरसागर

लातूर - औसा या राष्ट्रीय महामार्गाच्या निर्मितीचे काम सध्या सुरू असून एका बाजूला तयार झालेला सिमेंट रस्ता वाहतुकीसाठी खुला करावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष तथा नगराध्यक्ष डॉ. अफसर शेख यांनी नॅशनल हायवे अथोरिटी ऑफ इंडिया लातूरचे जिल्हाधिकारी यांना केले आहे. डॉ. अफसर शेख यांनी औसा लातूर राष्ट्रीय महामार्गाचे काम गेल्या सहा ते सात महिन्यापूर्वी रस्ता रुंदीकरणाच्या नावाने सुरु करून ठेवला व त्यानंतर कोणतेच काम करण्यात आले नाही.

हे देखील पहा -

या महामार्गावर अपघात होऊन अनेकांचे बळी गेले आहेत. तर अनेकांना गंभीर इजा झाल्या आहेत. अनेक गाड्यांच्या वाहनांचे प्रचंड नुकसान झाले आहे. राष्ट्रीय महामार्गाचे काम करण्यापूर्वी त्यास किमान चांगल्या दर्जाचा समांतर रस्ता तयार करून देणे आवश्यक असताना कसलीच पावले उचलले नाहीत.

औसा लातूर महामार्गावरील एका बाजूचा रस्ता वाहतुकीसाठी मोकळा करा - डॉ. अफसर शेख
मोफत रेशन धान्य वितरणाचा विस्तार होणार नाही; गरिबांना मोफत धान्य देण्याची योजना आता बंद होणार

दरम्यान 20 किलोमीटर अंतर असलेल्या या रस्ता निर्मिती कामापैकी एक बाजूचा किमान पंधरा किलोमीटर रस्ता हा पूर्ण तयार झाला असून तो देखील अद्याप गुत्तेदारच्या आडमुठ्या धोरणामुळे वाहतुकीसाठी खुला करण्यात आला नाही. हा मार्ग वाहतुकीसाठी खुला करावा या मागणीसाठी डॉ. अफसर शेख यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व लातूरचे जिल्हाधिकारी यांना निवेदन केला आहे. अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस जनहितार्थ राष्ट्रवादी स्टाईलने हा महामार्गा वाहतुकीसाठी खुला करू असा इशारा डॉ. अफसर शेख यांनी दिला आहे.

Edited By - Shivani Tichkule

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com