Shahrukh Film : शाहरूखचा जवान चित्रपट रिलीज होताच 'मालेगावचे शोले' भडकले, फॅन्सचा धुमाकूळ

Malegaon News : शाहरूखचा जवान चित्रपट रिलीज होताच 'मालेगावचे शोले' भडकले, फॅन्सचा धुमाकूळ
Shahrukh Film
Shahrukh FilmSaam tv

अजय सोनवणे

मनमाड (नाशिक) : जवान चित्रपट आज सर्वत्र प्रदर्शित झाला. पहिल्या दिवशी याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे पाहावयास मिळाले. यात मालेगाव (Malegaon) येथे पहिला शो पाहण्यासाठी आलेल्या (Shahrukh Khan) चाहत्यांनी चित्रपट गृहाच्या बाहेर जल्लोष केल्याचे पाहण्यास मिळाले. (Live Marathi News

Shahrukh Film
Bachchu Kadu News : दिव्यांगांसाठी बच्चू कडूच सरकार विरोधात उभे; निधी खर्च होत नसल्याने दिला उपोषणाचा इशारा

मालेगाव शहरात अनेक अभिनेत्यांच्या मोठा चाहता वर्ग असून जेव्हा जेव्हा अमिर, शाहरुख, सलमान खान यांचे नविन चित्रपट रिलीज होतात. तेव्हा प्रत्येकाचे फॅन्स आपल्या अभिनेत्याच्या चित्रपटाचे आगळ्या वेगळ्या पध्दतीने स्वागत करतात. शिवाय चित्रपट गृहात चिल्लर, पैशांची उधळण करतात. तर प्रसंगी चित्रपट गृहात फटाक्यांची आतिशबाजी करत असल्याच्या घटना घडल्या आहेत.

Shahrukh Film
Rain Alert : उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर भागात दमदार पाऊस

केक कापून जल्लोष, बॅनरला फुलांचा हार  
चित्रपट शौकीनांचे शहर आणि अभिनेते सलमान, शाहरुख, अमिर खान यांचे चाहते असलेल्या नाशिकच्या मालेगावमध्ये आज शाहरुख खानचा जवान चित्रपट प्रदर्शित झाला. चित्रपटाचा शो मोहन चित्रपट गृहात लागताच त्याच्या चाहत्यांनी हातात बँनर घेत घोषणा देत केक कापून फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोषात जवान चित्रपटाचे स्वागत केले. तर शाहरुखच्या बँनरला चक्क फुलांचा हार घातला.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com