Most Wanted गुन्हेगारास शस्त्रासह अटक; मालेगाव पाेलिसांची कामगिरी

रेकाॅर्डवरील गुन्हेगार असल्याचे पाेलिसांनी नमूद केले.
malegoan police, nashik news, youth
malegoan police, nashik news, youthsaam tv

- अजय साेनवणे

Nashik News : नाशिक (Nashik) जिल्ह्यातील मालेगाव (Malegoan) येथील मोस्ट वॉन्टेड असलेला गुन्हेगार पोलिसांच्या हाती लागला आहे. महाराष्ट्रातील मोठ्या शहरांसह हैद्राबाद येथे चोरी करणारा या गुन्हेगाराचा गेल्या १५ वर्षांपासून पोलिस शाेध घेत हाेते. (Breaking Marathi News)

malegoan police, nashik news, youth
Kanda Anudan News : राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; अनुदानासाठी 'या' तारखेपर्यंत अर्ज करता येणार

अकबर खान ऊर्फ कबर चोरवा असे अटक केलेल्या संशयित आराेपीचे नाव असल्याची माहिती पाेलिसांनी दिली. त्याला गावठी कट्टा व दोन जीवंत काडतूसांसह ताब्यात घेतले आहे. गेल्या १५ वर्षांपासून पोलिसांच्या रेकाॅर्डवरील गुन्हेगार असल्याचे पाेलिसांनी नमूद केले.

malegoan police, nashik news, youth
Nitin Gadkari's Panvel Speech: खरोखर मी थकलाेय आता, इजा...बिजा.. आता तिजा असं का म्हणाले नितीन गडकरी (पाहा व्हिडिओ)

अकबर हा मालेगावात अवैधरित्या हत्यार बाळगताे. शस्त्रांची विक्री करताे तसेच दहशत पसरविताे अशी गुप्त माहिती अप्पर पोलिस अधिक्षकांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिस पथकाने सापळा रचत किसमत सायजिंग जवळ छापा टाकून अकबरला ताब्यात घेतले.

त्याची अंगझ़ती घेतली असता त्याच्याकडे एक देशी कट्टा व दोन जिवंत काडतूस सापडली. हा सर्व मुद्देमाल पाेलिसांनी जप्त केला. त्याच्यावर पवारवाडी पोलिसात गुन्हा दाख करुन अटक करण्यात आली आहे. मालेगावसह, परभणी, कन्नड, जळगाव, लातूर, अकोला, तुळजापूर व हैद्राबाद येथे मोबाईल दुकान, घरफोडीचे वेगवेगळे गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत अशी माहिती पाेलिसांनी दिली.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com