Nandurbar News: नंदुरबारला कुपोषणाचा विळखा; कुपोषित बालकांची आकडेवारी धडकी भरवणारी, बालमृत्यूही वाढले

Nandurbar News: नंदुरबारमधील बालकांच्या कुपोषणावरून आमदार आमश्या पाडवी यांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप केले आहेत
Nandurbar News:
Nandurbar News: Saam tv

सागर निकवाडे

Malnutrition cases in nandurbar:

नंदुरबारमधून कुपोषणासंदर्भात मोठी बातमी हाती आली आहे. नंदुरबारमध्ये कुपोषण आणि बालमृत्यूची समस्या गंभीर झाली आहे. राज्यात ३३ हजार कुपोषित बालके असून त्यातील २३ हजार बालके नंदुरबारमधील असल्याचे समोर आले आहे. तसेच बालकांच्या मृत्यूच्या प्रमाणात वाढ झाल्याने चिंता वाढली आहे. नंदुरबारमधील बालकांच्या कुपोषणावरून आमदार आमश्या पाडवी यांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. (Latest Marathi News)

नंदुरबार जिल्ह्यात कुपोषित बालकांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. नंदुरबार जिल्ह्यात कुपोषित बालकांची संख्या 23 हजार बालके झाली आहे. जिल्हा रुग्णालयात अपूर्ण सुविधा आणि रिक्त पदांमुळे बालमृत्यूची संख्या वाढत असल्याचे समोर आले आहे.

Nandurbar News:
Beed Farmers News: शेतकरी मृत्यूला का कवटाळताहेत? ५ प्रमुख कारणं आली समोर

बालकांच्या अतिदक्षता विभागात एका पेटीत एक बालक ठेवलं जातं, तिथे चार ते पाच बालके अॅडमिट केले जात आहेत. जिल्हा रुग्णालयात एनआयसीयुमध्ये रिक्त अपूर्ण सुविधा असल्याचे समोर आले आहे.

शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आमश्या पाडवी यांनी या प्रश्नावर आवाज उचलला आहे. आमदार पाडवी यांनी अधिवेशनात आरोग्य मंत्र्यांनी आश्वासन देऊन आरोग्य सुविधा संदर्भात,जिल्ह्याचा दौऱ्यावर आले नाहीत, असा आरोप केला आहे.

Nandurbar News:
Thane Lift Accident: सात मजुरांच्या मृत्यूला जबाबदार कोण, ठाण्यातील लिफ्ट अपघात प्रकरणी गुन्हा दाखल...

'रिक्त पदे कधी भरणार कुपोषण बालमृत्यू आणि माता मृत्यूला सरकार जबाबदार असल्याचा आरोप आमदार पाडवी यांनी केला आहे. त्यांना ट्रायबल ॲडव्हायझर कमिटीची बैठक घेण्यास वेळ नाही. दोन वेळा तारीख जाहीर होवून बैठक रद्द केली. मुख्यमंत्र्यांना दिल्ली जाण्यासाठी वेळ मात्र आदिवासींच्या समस्या ऐकून घेण्यासाठी वेळ नसल्याचा आरोप आमदार पाडवी यांनी केली आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com