मामीचे मंगळसूत्र चोरणारा निघाला भाचा; तामसा पोलिसांनी केले अटक

बेसावध असलेल्या जाधव दाम्पत्याने या घटनेनंतर घाबरुन आरडाओरड केला. ताबडतोब पोलिस स्टेशन गाठून घटनेची माहिती सहाय्यक पोलिस निरीक्षक अशोक उजगरे यांना दिली.
मामीचे मंगळसूत्र चोरणारा निघाला भाचा; तामसा पोलिसांनी केले अटक
तामसा क्राईम न्यूज

तामसा ( जिल्हा नांदेड ) : पती व मुलगा यांच्यासह पहिल्यांदाच शतपावली करणाऱ्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून पसार झालेल्या चोरट्याला तामसा पोलिसांनी तीन तासात जेरबंद करण्याची कार्यवाही मंगळवारी (ता. सहा) रात्री केली आहे. येथील विमा प्रतिनिधी मनोज जाधव हे पत्नी सुवर्णा(वय ३४) व मुलासह मंगळवारी रात्री साडेआठच्या सुमारास शतपावली करण्यासाठी नांदेड रस्त्यावर चालत होते. त्यावेळी रस्त्याच्या कडेला दुचाकीवर उभा असलेल्या आरोपीने पती मोबाईलवर बोलण्यासाठी बाजूला गेल्याची हेरुन सुवर्णा यांच्या गळ्यातील मंगळसूत्र जबरदस्तीने हिसकावून पोबारा केला. या घटनेनंतर शहरात खळबळ उडाली होती.

बेसावध असलेल्या जाधव दाम्पत्याने या घटनेनंतर घाबरुन आरडाओरड केला. ताबडतोब पोलिस स्टेशन गाठून घटनेची माहिती सहाय्यक पोलिस निरीक्षक अशोक उजगरे यांना दिली. शहरातील या स्वरुपाची ही पहिलीच घटना असली तरी जिल्ह्यात मंगळसूत्र चोरीच्या घटना वाढविण्याच्या पार्श्वभूमीवर उजगरे यांनी शोधकार्य चालू केले. अज्ञात दुचाकीस्वार गणपती मंदिर भागातून जुन्या तामसा भागात घुसल्याची माहिती स्पष्ट झाली. आपला पाठलाग होत नसल्याची खात्री झाल्यानंतर आरोपी बिनधास्त होता. फौजदार लहू घुगे, फौजदार रामराव जेगाडे, पोलीस नाईक परशुराम राठोड, शिवाजी आरसुळे यांनी सापळा रचून जुन्या गावातून बाहेर जाणाऱ्या रस्त्यावर गस्त ठेवली.

हेही वाचा - हिंगोली ते वाशिम मार्गावर काळ्या बाजारात विक्रीसाठी जाणाऱ्या राशनच्या धान्यासह १३ लाख ५६ हजाराचा मुद्देमाल जप्त

रात्री नऊच्या सुमारास आरोपी पोलिस ठाण्यासमोरुन जात होता. घटनेची फिर्याद देऊन जाधव दाम्पत्य ठाण्यामधून बाहेर पडतातच आरोपीला सुवर्णा यांनी पाहिले. आरोपीला मंगळसूत्र चोरल्याची माहिती नव्हती. इथेच आरोपीची फसगत झाली. ताबडतोब पोलिसांना कळविताच आरोपीला उचलण्यात आले. आरोपी प्रतिक सुरेश शिवनीतवार रा. पापळवाडी (ता. माहूर) येथील रहिवासी असून तो तामसा येथे आपल्या मामाकडे आला होता. त्याच्याकडून चोरी केलेले मंगळसूत्र जप्त करण्यात आले आहे. या घटनेत सुवर्णा जाधव यांच्या गळ्याला दुखापत झाली आहे. पुढील तपास जमादार शिवाजी आरसुळे करीत आहेत.

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com