बनावट दस्तावेजावर पासपोर्ट बनवून विदेशवारी करणाऱ्याला अटक !

बनावट दस्तावेजाच्या आधारावर पासपोर्ट बनवून विदेशात प्रवास करणाऱ्या गुन्हेगाराला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. सय्यद अब्बास तुंबलानी असे या आरोपीचे नाव आहे.
बनावट दस्तावेजावर पासपोर्ट बनवून विदेशवारी करणाऱ्याला अटक !
बनावट दस्तावेजावर पासपोर्ट बनवून विदेशवारी करणाऱ्याला अटक ! SaamTv

मुंबई : बनावट दस्तावेजाच्या आधारावर पासपोर्ट बनवून विदेशात प्रवास करणाऱ्या गुन्हेगाराला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. सय्यद अब्बास तुंबलानी असे या आरोपीचे नाव असून त्याने बनावट नाव धारण करून त्या आधारावर पासपोर्ट बनविल्याची माहिती पोलिसांना प्राप्त झाली होती.

त्या आधारावर खंडणी विरोधी पथकाने त्याला अटक केली आहे. त्याच्या विरोधात जे.जे.मार्ग मुंबई, हैदराबाद, आंध्रप्रदेश, चेंबूर पोलीस ठाणे या तीन ठिकाणी गुन्हा दाखल असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. Man arrested for forging passport on fake documents

हे देखील पहा -

आरोपी सय्यद अब्बास तुंबलानी रा, दहिसर, ठाणे या इसमाने जसीम रेधाल तुंबलानी हे नाव धारण केले होते. या नावाच्या आधारावर बनविलेल्या दस्तावेजाच्या साहाय्याने पासपोर्ट बनवून तो विविध देशात भ्रमण करून आला आहे. तुंबलानी याचा पासपोर्ट क्रमांक टी -४०६५२६६ हा असून तो पासपोर्ट कार्यालय मुंबई येथे मंजूर करण्यात आला होता.

दरम्यान गुन्हे शाखेला याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी तपास करून सर्व प्रकारची खातरजमा करत आरोपी सय्यद अब्बास तुंबलानी याचा मागोवा घेतला. १३ जुलै रोजी आरोपी ठाकूरपाडा, दहिसर, ठाणे येथे येणार असलायची माहिती गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय शिंदे यांना मिळाली. पोलीस पथकाने सापळा रचून त्याला अटक केली.

बनावट दस्तावेजावर पासपोर्ट बनवून विदेशवारी करणाऱ्याला अटक !
लस न घेताच कोविन ऍप वर आले सर्टिफिकेट !

त्याच्याकडे एक लोखंडी सूर, बनावट पॅनकार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स सापडले आहे. त्याच्या विरोधात डायघर पोलीस ठाण्यात भादंवि ४२०, ४६५, ४६८, ४७१ पासपोर्ट कायदा १२ (अ ) (ब ) महा. पो. का. कलम ३७ (१), १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी सय्यद अब्बास तुंबलानी उर्फ जसीम रेधाल तुंबलानी याला न्यायालयाने १७ जुलै पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले असून अधिकच तपास डायघर पोलीस करत आहेत.

Edited By : Krushnarav Sathe

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com