हौसेला मोल नाही! मजुराने थाटामाटात साजरा केला गाईचा डोहाळे जेवणाचा कार्यक्रम

गावखेड्यातील संस्कृतीत गाईला मोठं महत्त्व आहे. हाच श्रद्धा आणि आदरभाव जपत एका शेतमजुराने गाईचे डोहाळे जेवणाचा कार्यक्रम मोठ्या थाटामाटात साजरा केला.
Cows Dohale Jevan Program In Latur
Cows Dohale Jevan Program In Laturदीपक क्षीरसागर

दीपक क्षीरसागर

लातूर: गावखेड्यातील संस्कृतीत गाईला मोठं महत्त्व आहे. हाच श्रद्धा आणि आदरभाव जपत एका शेतमजुराने गाईचे डोहाळे जेवणाचा कार्यक्रम मोठ्या थाटामाटात साजरा केला. सोयऱ्यासह गावकरी देखील मोठ्या उत्साहात या डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमात सहभागी झाले होते. हा विषय आता चर्चेचा विषय बनलाय. (Latur Latest News In Marathi)

Cows Dohale Jevan Program In Latur
Kolhapur Breaking: इचलकरंजीमध्ये केमिकल फॅक्टरीला आग; कोट्यवधींचे नुकसान (पहा Video)

म्हणतात ना हौसेला मोल नाही, आर्थिक परिस्थिती कितीही बेताची असो. श्रद्धा आणि हौस जिथं आली तिथं त्याला मोल नाही. लातुर (Latur) जिल्ह्यातील धनेगाव या छोट्याश्या गावातील दत्तू विठ्ठल चेवले या शेतमजुराला सासऱ्याने एक गाय आंदण दिली होती. त्याची पाचवी पिढीची गाय पत्नीच्या 16 सोमवारच्या उद्यापन कार्यक्रमा दिवशी जन्मली. त्यामुळे तिचं नाव पार्वती ठेवलं. (Cows Dohale Jevan Program In Latur)

हे देखील पहा-

या पार्वतीचा लेकीप्रमाणे चेवले कुटुंबाने पालनपोषण करत असताना ती गाभण गेली आणि तीच डोहाळे जेवण करावा असा विचार असताना लेकीसमान असलेल्या गाईच्या डोहाळे जेवण कार्यक्रम करावं असं निर्णय घरात झाला. यासाठी मुली जावई ईवाई पाहुणे गावकरी यांना निमंत्रण दिले. डोहाळे जेवण कार्यक्रमात ज्या काही विधी आहेत त्या सर्व करण्यात आल्या. या कार्यक्रमाला सगेसोयऱ्यासह गावकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी झाले. आज विज्ञान तंत्रज्ञानाच्या युगात रूढी परंपरा लोप पावल्या जात असल्याची ओरड होत असताना, एका सामान्य शेतमजुराने गाईचे डोहाळे जेवण कार्यक्रम केले याची आता जोरदार चर्चा होत आहे. (Viral News Of Latur)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com