Kolhapur News: अपघात की आत्महत्या! स्टर्लिंग टॉवरवरुन पडून तरुणाचा मृत्यू

Kolhapur News: घटनेमुळे इमारतीसह परिसरात एकच खळबळ माजली.
cRIME nEWS
cRIME nEWS Saam TV

रणजीत माजगावकर

Kolhapur News : इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरुन पडून एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याचा घटना कोल्हापुरात घडली आहे. या व्यक्तीची अद्याप ओळख पटलेली नाही. घडलेली घटना अपघात आहे की व्यक्तीने आत्महत्या केली, याचा तपास पोलिस करत आहेत. (Kolhapur News)

मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील शाहूपुरी गवत मंडई परिसरात असणाऱ्या स्टर्लिंग टॉवर परिसरात ही घटना घडली. स्टर्लिंग टॉवरच्या तिसऱ्या मजल्यावरून पडून एका अनोळखी व्यक्तीचा मृत्यू झाला. आज सकाळच्या सुमारास ही घटना घडली. घटनेमुळे इमारतीसह परिसरात एकच खळबळ माजली. (Latest News)

cRIME nEWS
Bhaskar Jadhav : शिवसेनेची तोफ भास्कर जाधव विधानसभेत दिसणार नाहीत? पायऱ्यांना नमस्कार करुन निघाले; नेमकं काय घडलं? VIDEO

या घटनेची माहिती मिळताच शाहूपुरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि जखमी असलेल्या व्यक्तीला सीपीआर रुग्णालयात दाखल केलं. मात्र उपचारापूर्वीच त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केलं. या युवकाची ओळख अद्याप पटलेली नाही.

या व्यक्तीने आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. सध्या पोलीस मृत युवकाची ओळख पटवण्याचा प्रयत्न करत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com