बायकोला खुश ठेवण्यासाठी कायपण! ATMमध्ये अफरातफर करून नागरिकांना घालायचा गंडा

एटीएम बाहेर दोन-दोन तास उभं राहून भोळा-भाबडा एटीएम मधून माणूस पैसे काढायला आला की, मी पैसे काढून देतो असं सांगून एटीएमची फेरफार करून लोकांना गंडवणाऱ्या एकाला जालन्यातील सदर बाजार पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
बायकोला खुश ठेवण्यासाठी कायपण! ATMमध्ये अफरातफर करून नागरिकांना घालायचा गंडा
ATMSaam Tv

लक्ष्मण सोळुंके

जालना: प्रेयसीसोबत लग्न झाल्यानंतर तिला खुश ठेवण्यासाठी एटीएम बाहेर दोन-दोन तास उभं राहून भोळा-भाबडा एटीएम मधून माणूस पैसे काढायला आला की, मी पैसे काढून देतो असं सांगून एटीएमची फेरफार करून लोकांना गंडवणाऱ्या एकाला जालन्यातील (Jalna) सदर बाजार पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. (Jalna Crime News)

ATM
Irrfan Khan Death Anniversary: इरफान खानच्या मुलाची भावनिक पोस्ट, म्हणाला...

शैलेश शिंदे असं या (22) वर्षीय आरोपीचं नाव असून सध्या तो सदर बाजार पोलिसांनी त्याला अटक केलीय. शैलेश हा मूळचा लातूर (Latur) जिल्ह्यातील निलंगा येथील रहिवासी आहे. त्याचे आई वडील मोलमजुरी करतात. काही वर्षांपूर्वी त्याचे आईवडील नाशिकमध्ये (Nashik) कामासाठी गेले असताना शैलेश देखील त्यांच्यासोबत गेला. या दरम्यान त्याचे जुगार खेळणाऱ्या मुलांशी मैत्री झाली आणि एका मुलीच्या तो प्रेमात पडला. घरच्यांची परवानगी नसताना त्याने प्रेयसीसोबत लग्न करून तो पुन्हा लातूरमध्ये राहण्यासाठी आला.

हे देखील पाहा-

मिळालेल्या माहितीनुसार, घर चालवण्यासाठी पैसे नसल्याने तसेच प्रेयसीला खुश ठेवण्यासाठी तो वेगवेगळ्या जिल्ह्यात जाऊन एटीएम बाहेर उभा राहायचा. भोळाभाबडा माणूस एटीएममध्ये (ATM) पैसे काढण्यासाठी आला की, त्याला मी पैसे काढून देतो असं सांगून त्याला पासवर्ड विचारायचा. त्यानंतर दुसरंच एटीएम त्याच्या हातात देऊन त्याच्या एटीएममधून पैसे काढून घेऊन शैलेश लोकांना गंडवायचा. जालन्यातील अशा 4 ते 5 जणांना त्याने अशाच पद्धतीने गंडा घातल्यानंतर पोलीस त्याच्या मागावर होते. अखेर पोलीसांनी या महाभागाला अटक केलीय. याबद्दल अधिक तपास पोलीस करतायत.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com