Raigad: मानवनिर्मित वणव्याने घेतला पेट; कनकेश्वर डोंगरावरील वनसंपत्तीचं मोठं नुकसान...

Kankeshwar Mountain Fire: अलिबागमधील कनकेश्वर डोंगरावर भडकला मानवनिर्मित वणवा; वनसंपदेची मोठी हानी...
Man-made fires erupted; Big loss of forest resources on Kankeshwar mountain
Man-made fires erupted; Big loss of forest resources on Kankeshwar mountainराजेश भोस्तेकर

राजेश भोस्तेकर, रायगड

रायगड: अलिबाग तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असणारे कनकेश्वर डोंगरावर मंगळवारी (दि. १५) संध्याकाळच्या सुमारास मोठ्या प्रमाणात वणवा लागला. त्यामुळे डोंगरावरील औषधी वनसंपत्तीबरोबरच इतर महत्त्वाच्या वनस्पती, सूक्ष्म जीव आदींची मोठ्या प्रमाणात जीवितहानी होऊन पर्यावरणाचे (Environment) नुकसान झाले आहे. वनविभागाला वणव्याची (Fire) माहिती मिळताच वणव्याच्या ठिकाणी वनकर्मचाऱ्यांकडून आग विझविण्याचे शर्थीचे प्रयत्न केले गेले. कनकेश्वर डोंगराला (Kankeshwar Mountain) लागलेल्या आगीने परिसरात काळ्या धुराची चादर पसरलेली आहे. (Man-made fires erupted; Big loss of forest resources on Kankeshwar mountain)

हे देखील पहा -

डोंगर भागात असलेली अनमोल वनसंपदा (Forest Resources) काही दिवसांपासून लावलेल्या वणव्यात भस्मसात होत आहे. मानवी वणवा हा पुढच्या काळासाठी घातक होऊ लागला आहे. अलिबाग (Alibaug) तालुक्यातील कनकेश्वर डोंगरावर असाच मानवी वणवा काल मंगळवार 15 मार्च रोजी लावण्यात आला. कनकेश्वर डोंगर हा निसर्गरम्य असल्याने शंकराचे श्री कनकेश्वर देवस्थान याठिकाणी आहे. त्यामुळे या डोंगराची एक वेगळी ओळखही आहे. मात्र लागलेल्या वणव्यात या डोंगरावरील वनसंपत्ती जळून खाक झाली आहे आणि ही कधीही भरून न येणारी हानी झाली आहे. अलिबाग तालुक्यातील कार्ले खिंड, राम धरणेश्वर डोंगर भागातही रोज वणवे लावले जात आहेत. याबाबत कुठेतरी वन विभागाने (Forest Depertment) खबरदारी घेणे गरजेचे आहे.

वणव्याबाबतीत शेवटची माहिती हाती येईपर्यंत वनविभागाचे वनरक्षक पंकज घाडी आणि विशाल पाटील यांच्या मदतीला एक पर्यावरणमित्र संकेत राजेंद्र कवळे यांनी आग विझवण्यासाठी सुरुवात केली होती, काही वेळाने वणव्याची माहिती मिळाल्यानंतर कुकुच-कु कंपनीचे मालक आणि भाविक कुणाल पाथरे यांच्यासोबत साईश पाथरे, विवेक जोशी यांनीसुद्धा वणवाच्या ठिकाणी पिण्याचे पाणी आणि इतर अत्यावश्यक साहित्यासह उपस्थिती लावून मदतकार्य करण्यासाठी पुढाकार घेतला आहे.

Man-made fires erupted; Big loss of forest resources on Kankeshwar mountain
लातूर: चार शेतकऱ्यांचा 12 एकर ऊस जळून खाक; लाखोंचे आर्थिक नुकसान

निराशेची बाब म्हणजे परिसरातील पंचक्रोशीतील फक्त सहाजणांकडून ही आग विझवण्यासाठी आटोकाट प्रयत्न केला. वणवा लागल्याची माहिती या ठिकाणी येणाऱ्या भाविकांना, पर्यावरणप्रेमींना (Environmentalist) समजताच त्यांनी हळहळ व्यक्त केली आहे. निसर्गरम्य डोंगरावर काळी चादर पसरून आता डोंगर काळेशार दिसणार म्हणून खंत देखील व्यक्त केली आहे. तसेच आग लावणाऱ्या समाजकंटकावर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com