अहमदनगर हादरलं! पाच वर्षाच्या बालिकेवर नराधमाचा लैंगिक अत्याचार

नराधमाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
अहमदनगर हादरलं! पाच वर्षाच्या बालिकेवर नराधमाचा लैंगिक अत्याचार
Crime News, Nagar, Pathardi, DevraiSaam TV

मोबीन खान

अहमदनगर: राहुरी तालूक्यातील आरडगांव परिसरात निंदनीय असा प्रकार उघडकीस आला आहे. आरडगांव येथील किशोर पवार या नराधमाने एका ५ वर्षीय बालिकेला तिच्या घरातून उचलून नेले. त्यानंतर त्याने त्या ५ वर्षीय बालिके सोबत लैंगिक अत्याचार केला आणि तिचा गळा आवळून तिला मारण्याचा प्रयत्न केला.

पोलिसांनी (Police) दिलेली माहिती अशी की, १८ जून रोजी दुपारी साडेबारा वाजे दरम्यान त्या ५ वर्षीय बिलिकेचे आई वडिल बाहेर गेले होते. त्या संधीचा फायदा घेऊन आरोपी किशोर ऊर्फ केश्या विजय पवार, राहणार आरडगांव, ता. राहुरी. या नराधमाने त्या बालीकेला तिच्या घरातून उचलून नेले. आरडगांव परिसरात असलेल्या नारळाच्या झाडा जवळील खुर्द यांचे शेताचे बांधाजवळ त्या नराधमाने त्या बालीकेच्या अंगावरील कपडे काढून तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. त्यानंतर तिचा कापडाच्या सहाय्याने गळा आवळून तिला जिवे मारण्याचा प्रयत्न केला.

Crime News, Nagar, Pathardi, Devrai
प्रसाद लाड की भाई जगताप, कोण मारणार बाजी?; उद्याच्या निकालावर सर्वांच लक्ष

यावेळी घरातून बेपत्ता झालेल्या मुलीचा शोध घेत असलेल्या तिच्या आईने सदर घटना पाहिली. तिने ताबडतोब त्या नराधमाला जागेवरच पकडून आरडाओरड केली. पिडित बालिकेचे वडिल येत असल्याचे पाहून त्या नराधमाने पीडित बालिकेच्या आईला धक्का देवून घटनास्थळावरून पसार झाला. नशीब बलवत्तर म्हणून त्या बालीकेचा जीव वाचला. या घटनेनंतर त्या बालिकेला अहमदनगर (Ahamadnagar) जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

घटनेचे गांभीर्य ओळखून श्रीरामपूर येथील अप्पर पोलीस (Police) अधीक्षक स्वाती भोर, उप विभागीय पोलीस अधिकारी संदिप मिटके, श्रीरामपूर तालूका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मच्छिंद्र खाडे, पोलीस उप निरीक्षक एस. बी. देवरे, राहुरी पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक निरज बोकील, सज्जन नाऱ्हेडा आदी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. पोलीस पथकाने आरोपीचा शोध घेऊन आरोपीला अटक केली आहे.

Crime News, Nagar, Pathardi, Devrai
Maharashtra Covid Update : नागरिकांना दिलासा नाहीच! नवीन कोरोना रुग्णसंख्या टेन्शन वाढवणारी

पीडित मुलीच्या आईने राहुरी पोलीस (Police) ठाण्यात फिर्याद दिली. तिच्या फिर्यादीवरून धराधम आरोपी किशोर ऊर्फ केश्या विजय पवार, राहणार आरडगांव, ता. राहुरी. याच्या विरोधात अपहरण, बलात्कार तसेच बालकांचे लैंगिक अत्याचार प्रतिबंधक अधिनियम कायदा कलम नूसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सज्जन नाऱ्हेडा हे करीत आहेत.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com