रागाने बघितले म्हणून इसमाची हत्या; नागपुरात खळबळ

Nagpur Crime News : नागपुरात किरकोळ वादातून चाकूने वार करून एकाने हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
Man stabbed to death in nagpur, Nagpur crime News in Marathi, Nagpur Latest Crime News in Marathi
Man stabbed to death in nagpur, Nagpur crime News in Marathi, Nagpur Latest Crime News in MarathiSaam Tv

नागपूर : नागपुरात किरकोळ वादातून चाकूने वार करून एकाने हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे नागपुरात(Nagpur) एकच खळबळ उडाली आहे. वारंवार होणाऱ्या गंभीर गुन्ह्याने नागपुरात लोकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दोन गट बारमध्ये वेगवगळे दारू पीत बसले होते. त्यातील दोघांनी एकमेकांकडे रागाने बघितल्याच्या वादातून एकाची हत्या झाल्याची घटना घडल्याची माहिती समोर येत आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा अधिक तपास सुरु केला आहे. (Nagpur Latest Crime News in Marathi)

हे देखील पाहा -

मिळालेल्या माहितीनुसार, नागपूरमध्ये विलसन आणि त्याचे मित्र दारू पीत बसले होते. त्यादरम्यान सागर संजय साहू देखील दारू पिण्यासाठी त्याच्या मित्रांबरोबर बारमध्ये आला. बारमध्ये दोघांचे टेबल समोरासमोर होते. विलसन आणि सागर यांच्यामध्ये जुने वाद होते. सागर आणि विलसन यांच्यात नजरानजर झाली, त्यादरम्यान सागरने विलसनकडे रागाने पाहिले. त्यावरून दोघांमध्ये पुन्हा बारमध्येच वाद झाला. दारू प्यायल्यानंतर दोघेजण आपापल्या मित्रांसहित बारमधून बाहेर पडले. दोघेही बारच्या बाहेर येऊन पुन्हा भांडू लागले. यादरम्यान विलसनने स्वत: जवळ ठेवलेला चाकू बाहेर काढून सागरच्या मानेवर आणि कंबरेवर सपासप वार केले. या जिवघेण्या हल्ल्यात सागर गंभीर जखमी झाला. त्यानंतर सागरला त्याच्या मित्रांनी जवळच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्याला तपासले असता मृत घोषित केले. सागरच्या मृत्यूमुळे नागपूर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी सदर प्रकरणाचा तपास सुरु केला आहे.

Man stabbed to death in nagpur, Nagpur crime News in Marathi, Nagpur Latest Crime News in Marathi
लग्नाचा बस्ता खरेदीला गेली; दुकानदाराने नववधूला प्यायला दिलं केमिकलयुक्त पाणी

दरम्यान, नागपुरात हत्येच्या गुन्ह्यात (Nagpur Crime) वाढ होत असल्याने अनेकांकडून चिंता व्यक्त केली जात आहे. किरकोळ कारणावरून हत्येच्या घटना वाढल्याने नागपुरात लोकांकडून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित केला जात आहे. वारंवार क्षुल्लक कारणावरून होणाऱ्या हत्येमुळे नागपुरात नेमकं चाललं तरी काय असे नानाविविध प्रश्न लोकांकडून उपस्थित केले जात आहेत.

Edited By - Vishal Gangurde

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com