मंगळवेढा: वाळू माफियांच्या गाडीने पोलिसाला चिरडले; जागीच मृत्यू (पहा video)

वाळूची गाडी थांबवत असताना पोलीस कॉन्स्टेबल गणेश प्रभू सोनलकर (वय 32) यांना भरधाव वेगाने येणाऱ्या वाळू टेम्पोने चिरडले अन् त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे.
मंगळवेढा: वाळू माफियांच्या गाडीने पोलिसाला चिरडले; जागीच मृत्यू (पहा video)
मंगळवेढा: वाळू माफियांच्या गाडीने पोलिसाला चिरडले; जागीच मृत्यू (पहा video)भारत नागणे

भारत नागणे

सोलापूर : वाळूची गाडी Sand Truck थांबवत असताना पोलीस कॉन्स्टेबल Police Constable गणेश प्रभू सोनलकर (वय 32) यांना भरधाव वेगाने येणाऱ्या वाळू टेम्पोने चिरडले अन् त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना आज सकाळी 9.30 च्या सुमारास गोनेवाडी-शिरशी Gonewadi Sarashi रोडवरील हॅट्सन डेयरी येथे घडली.

हे देखील पहा-

नेमकं काय झालं?

याबाबत सविस्तर माहिती अशी देण्यात आली आहे की, लोकअदालत असल्यामुळे गणेश सोनलकर हे समन्स बजावण्यासाठी त्या ठिकाणी गेले होते. गोनेवाडीचे पोलीस पाटील यांना हॅट्सन डेयरी येथे या म्हणून गणेश सोनलकर हे तिथे त्यांची वाट पाहत थांबले होते.

मंगळवेढा: वाळू माफियांच्या गाडीने पोलिसाला चिरडले; जागीच मृत्यू (पहा video)
Solapur: प्रियकराचा लग्नास नकार; पोलिसांनी स्वखर्चाने लावलं 'आंतरजातीय लग्न'!

त्या वेळी समोरून येत असलेल्या वाळूच्या टेम्पोला त्यांनी हात केला. तर वाळू टेम्पो चालकाने गाडी त्यांच्या अंगावर घालून निर्दयीपणे चिरडले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर या प्रकरणातील आरोपींचा लवकरच शोध घेणार असल्याचे अप्पर पोलीस अधिक्षक हिम्मत जाधव यांनी सांगितले.

Edited By-Sanika Gade

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com