Manmad News: हातगाडीवर बांगड्या विकणाऱ्याला चार लाखाचे बिल; महावितरणचा भोंगळ कारभार

हातगाडीवर बांगड्या विकणाऱ्याला चार लाखाचे बिल; महावितरणचा भोंगळ कारभार
Mahavitaran Bill
Mahavitaran BillSaam tv

अजय सोनवणे

मनमाड (नाशिक) : मनमाड शहरातील महावितरणचा (Mahavitaran) भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. साधारण घरात राहणाऱ्या आणि हातगाडीवर बांगड्या विकून आपले कुटूंब चालविणाऱ्या इकबाल शेख (Manmad) या व्यक्तीला एक महिन्याचे तब्बल चार लाखाचे वीज बिल पाठविल्याचा अजब प्रकार घडला आहे. (Breaking Marathi News)

Mahavitaran Bill
Hingoli News: दहा मिनिटाच्या वादळाने हाहाकार; झाडे गाड्यांवर पडली, रस्ते झाले जाम

मनमाड येथील शेख हे हातगाडीवर बांगड्या विक्रीचा व्‍यवसाय करतात. यातून मिळत असलेल्‍या पैशांमध्‍ये घर चालवत असतात. यामुळे त्‍यांच्‍या घरात मोठे उपकरण नाहीच. घरात अवघे तीन बल्ब, एक पंखा एवढेच विद्युत उपकरण असतांना एका महिन्यापोटी ४ लाख ५ हजार ४९० रुपयांचे बिल पाठविले. शेख यांनी याबाबत महावितरण कार्यालयात जाऊन तक्रार केली.

Mahavitaran Bill
Maval News: जुन्या मुंबई पुणे रोडवर रोजच ट्राफिक जाम; पोलीस मात्र पावत्या फाडण्यात मग्न

तरीही निम्‍मे बिल

बिलाची तक्रार केल्यानंतर अधिकाऱ्यांनी पाठविलेल्या बिलातून काही रक्कम कमी करुन त्यांच्या हातात २ लाख १३ हजार ३६० रुपयांच बिल टेकवले. कुठलीही थकबाकी नसतांना इतक्या मोठ्या रकमेचे बिल पाहून ते भरायचे कसे? अशा प्रश्न त्यांना पडला. मात्र त्यांच कुठलेही ऐकून न घेता त्यांचे विजमीटर मात्र काढून नेण्यात आल्याने त्यांना अंधारात राहण्याची वेळ आली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com