Manmad News: धावत्या रेल्वेत शौचालयाजवळ महिलेची प्रसुती

धावत्या रेल्वेत शौचालयाजवळ महिलेची प्रसुती
Railway
RailwaySaam tv

अजय सोनवणे

मनमाड (नाशिक) : धावत्‍या रेल्‍वेमध्‍ये प्रसुती झाल्‍याच्‍या अनेक घटना झाल्‍या आहेत. अशीच घटना (Bhusawal) भुसावळ– मनमाड दरम्‍यान रेल्‍वे (Railway) आज झाली. प्रसव वेदना होत असल्‍याने महिलांनी प्रसंगावधान दाखवत महिला बोगीच्‍या शौचालयाजवळ प्रसुती केली. (Live Marathi News)

Railway
Onion Price: कांद्याचे भाव गडगडले; सरासरी ९२५ रुपये दर

गर्भवती असलेली महिला रेल्वेने प्रवास करत कल्याणला जाण्यासाठी निघाली होती. भुसावळ रेल्वे स्थानक सोडल्यानंतर तिला प्रसव वेदना जाणवू लागल्या. तिच्या जिवाची सुरू असलेली घालमेल सहप्रवासी महिला व रेल्वे कर्मचारी यांच्या लक्षात आली अन् त्यानंतर महिलांनी प्रसंगावधान राखत रेल्वे कर्मचाऱ्यांच्या मदतीने त्या महिलेची रेल्वेच्या बोगीतील शौचालयाजवळ तिची प्रसूती करण्यात आली आणि एका गोंडस बाळाला तिने जन्म दिला.

त्‍याच गाडीतून महिलेला केले रवाना

ही घटना धावत्या काशी एक्स्प्रेसमध्ये घडली. संजना दत्ता चव्हाण असे प्रसुत झालेल्या महिलेचे नाव आहे. नांदगाव रेल्वे स्थानकात याबाबत कळविण्यात आल्यानंतर रेल्वे विभागाचे डॉ. संदीप ठोके हे रुग्णवाहिका व वैद्यकीय टीमसह हजर झाले. डॉक्टरांनी तिची वैद्यकीय तपासणी करून महिला व तिचे नवजात बालक हे दोघेही सुखरूप असल्याचे सांगितले. त्याच काशी एक्स्प्रेसने पुन्हा ती महिला कल्याणकडे रवाना झाली.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com