मनमाड येवला रस्त्यावर कारचा भीषण अपघात; ४ मित्र जागीच ठार

एक जण गंभीर जखमी असून त्याला उपचारासाठी मनमाडच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल
मनमाड येवला रस्त्यावर कारचा भीषण अपघात; ४ मित्र जागीच ठार
Nashik Accident Newsअभिजीत सोनावणे

नाशिक - मनमाड येवला रस्त्यावर कारच्या भीषण अपघातात (Accident) ४ मित्रांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर १ जण गंभीर जखमी आहे. येवल्याहून मनमाडला (Manmad) येत असताना समोरून येणाऱ्या भरधाव कंटेनरने धडक दिल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे. कंटेनरने धडक दिल्याने चालकाचं कारवरुन नियंत्रण सुटलं आणि गाडी झाडावर जाऊन आदळल्याने हा अपघात झाला. पुणे-इंदोर महामार्गावर अंकाई किल्ल्याच्या बाजूने मानामडच्या दिशेने येत असताना हा अपघात झाला.

हे देखील पाहा -

मनमाडपासून जवळ असलेल्या पुणे-इंदौर महामार्गावर ही घटना घडली आहे. पाचही मित्र कारमधून येवल्याहून मनमाडला येत होते. अपघात इतका भीषण होता की यात कारचा चक्काचूर होऊन त्यातील ५ पैकी ४ जणांचा मृत्यू झाला. एक जण गंभीर जखमी असून त्याला उपचारासाठी मनमाडच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

Edited By - Shivani Tichkule

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.