मनोहर मामाचा उंदर गावातील आश्रम बेकायदेशीर

मनोहर मामा ने बांधकाम करण्यापूर्वी ग्रामपंचायतीची कोणतीही परवानगी न घेता लेआऊट न सादर करता बेकायदेशीरपणे बांधकाम केले आहे.
मनोहर मामाचा उंदर गावातील आश्रम बेकायदेशीर
मनोहर मामाचा उंदर गावातील आश्रम बेकायदेशीर भारत नागणे

पंढरपूर

एंकर- सोलापूर जिल्ह्यातील उंदरगाव येथील स्वयंघोषित महाराज मनोहर भोसले यांनी उभारलेला आश्रम आणि बाळूमामाच्या मंदिराचे बांधकाम बेकायदेशीर असल्याचे समोर आले आहे. उंदरगाव ग्रामपंचायतीने तसे लेखी पत्र आदमापूर संस्थांनास दिले आहे. त्यामुळे मनोहर मामाच्या अडचणी वाढल्या आहेत.

हे देखील पहा -

संत बाळूमामांच्या नावाने मंदिर बांधून ममोहर भोसले हे भक्तांकडून आर्थिक लूट करीत असल्याचा आरोप आदमापुर ग्रामपंचायतीने ठराव करून केला आहे. या प्रकारानंतर राज्यभरात मोठी खळबळ उडाली आहे. मनोहर मामा विरोधात पोलीस ठाण्यात तक्रारी ही दाखल झाल्यात आहेत.

मनोहर मामाचा उंदर गावातील आश्रम बेकायदेशीर
लसीकरण पथक असल्याचा बनाव करत दरोडा टाकणारे सीसीटीव्ही मध्ये कैद

त्यानंतर मनोहर मामाचे अनेक कारनामे समोर येऊ लागले आहेत. त्यापैकीच त्याने उभारलेला आश्रम, मंदिर आणि मठाचे बांधकाम बेकायदेशीर आणि विनापरवाना केल्याचे समोर आले आहे. मनोहर मामा ने बांधकाम करण्यापूर्वी ग्रामपंचायतीची कोणतीही परवानगी न घेता लेआऊट न सादर करता बेकायदेशीरपणे बांधकाम केले आहे.

या बेकायदेशीर बांधकामाची संपूर्ण माहिती उंदरगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच शितल नाळे यांनी आदमापुर ग्रामपंचायतीस लेखी ठरावाद्वारे दिली आहे.

Edited By : Krushnarav Sathe

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com