धक्कादायक : नारायणगाव ग्रामपंचायतीच्या कचरा डेपोत आढळला माणसाचा तुटलेला पाय!
धक्कादायक : नारायणगाव ग्रामपंचायतीच्या कचरा डेपोत आढळला माणसाचा तुटलेला पाय!रोहिदास गाडगे

धक्कादायक : नारायणगाव ग्रामपंचायतीच्या कचरा डेपोत आढळला माणसाचा तुटलेला पाय!

नारायणगाव ग्रामपंचायतीच्या कचरा डेपोत माणसाचा तुटलेला पाय आढल्याची धक्कादायक घटना समोर आल्यानंतर नारायणगाव पोलीस घटनास्थळी दाखल झाले!

जुन्नर : जुन्नर तालुक्यातल्या नारायणगाव येथील बसस्थानका शेजारीच असणाऱ्या मते हॉस्पिटल मध्ये एका 81 वर्षीय जेष्ठ व्यक्तीवर शस्त्रक्रिया करून त्याचा पाय टाकण्यात आला होता. हा काढून टाकलेला पाय बुधवारी सकाळी ग्रामपंचायतीच्या कचरा गाडीत आढळून आला होता.

हे देखील पहा :

या घटनेनंतर तर्कवितर्कांना उधाण येऊन नारायणगाव परीसरात मोठी खळबळ उडाली होती. ग्रामस्थांमध्ये कोणाचा तरी खून झाल्याची चर्चा देखील पसरली होती. मात्र, यासंदर्भातील सविस्तर माहिती समोर आली आणि अखेर आज सकाळी नारायणगाव पोलिसांनी मते हॉस्पिटलचे डॉ.अजय मते यांच्यावर गुन्हा दाखल केला असून हलगर्जीपणाने साथरोग पसरवल्याचा ठपका ठेवला आहे.

धक्कादायक : नारायणगाव ग्रामपंचायतीच्या कचरा डेपोत आढळला माणसाचा तुटलेला पाय!
Nagpur Crime : गाण्याचा गायक कोण? यावरून मित्रांनी केली मित्राची हत्या! पहा VIDEO

पोलीस निरीक्षक विलास देशपांडे यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आहे. मते हॉस्पिटलमध्ये 81 वर्षीय जेष्ठ नागरिकाला उपचारासाठी दाखल केले होते. पायाला गँगरीन झाल्यामुळे शस्त्रक्रिया करून त्या व्यक्तीचा पाय काढून टाकण्यात आला होता.

Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com