Sangli Boy Beating By Mantrik: भूतबाधा काढण्यासाठी मांत्रिकाने केली अमानुषपणे मारहाण, मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू

Sangli Latest News: सांगली जिल्ह्यातल्या कवठेमहांकाळमध्ये (Kavathe Mahankal) ही घटना घडली आहे.
Sangli Boy Beating By Mantrik
Sangli Boy Beating By MantrikSaam Tv

Sangli Crime News: सांगलीमधून (Sangli) एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. भूतबाधा काढण्यासाठी मांत्रिकाने केलेल्या अमानुष मारहाणीमध्ये एका 14 वर्षांच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. हा मांत्रिक कर्नाटकमधील (Karnataka) असल्याची माहिती समोर आली आहे. सांगली जिल्ह्यातल्या कवठेमहांकाळमध्ये (Kavatemahankarl) ही घटना घडली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

Sangli Boy Beating By Mantrik
Nagpur Crime News: क्रिकेटने घेतला आई अन् लेकराचा जीव; दोघांवर एकाचवेळी झाले अंत्यसंस्कार

मिळालेल्या माहितीनुसार, कवठेमहांकाळ येथील इरळी गावामध्ये ही घटना घडली आहे. आर्यन दिपक लांडगे असं मृत मुलाचे नाव आहे. आर्यनला गेल्या काही दिवसांपासून सतत ताप येत होता. डॉक्टरकडे सतत जाऊ देखील त्याचा ताप काही जात नव्हता. त्यामुळे आर्यनच्या आई-वडिलांना त्यांच्या जवळच्या एका नातेवाईकाने कर्नाटकातल्या कुडची येथील शिरगूर गावामध्ये असलेल्या मांत्रिकाकडे उपचारासाठी नेण्याचा सल्ला दिला.

मुलगा बरा व्हावा या आशेने आर्यनचे कुटुंबीय त्याला तिकडे घेऊन गेले. तर या मांत्रिकाने आर्यनला बाहेरची बाधा झाली असल्याचे सांगितले. आर्यनच्या अंगात भूत शिरलं असून ते बाहेर निघत नाही त्यामुळे त्याला हा त्रास होत असल्याचे मांत्रिकाने सांगितले. आर्यनच्या अंगातील ही भूतबाधा काढण्यासाठी या मांत्रिकाने त्याला अमानुष मारहाण केली. या मारहाणीमध्ये आर्यनला गंभीर दुखापत झाली.

Sangli Boy Beating By Mantrik
Nandurbar Accident News: चांदशैली घाटात पिकअप दरीत कोसळली; अपघातात ३ जणांचा जागीच मृत्यू

जखमी झालेल्या आर्यनच्या कुटुंबीयांनी त्याला उपचारासाठी मिरज येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. पण उपचारादरम्यान आर्यनचा मृत्यू झाला. आर्यनच्या मृत्यूमुळे त्याच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला. दरम्यान, या गंभीर घटनेची दखल कवठेमहांकाळ येथील अंनिसच्या कार्यकर्त्यांनी घेतली. त्यांनी आर्यनच्या कुटुंबीयांची भेट घेऊन मांत्रिकाविरोधात गुन्हा दाखल करण्यास सांगितले. त्यानंतर अंनिसच्या कार्यकर्त्यांसोबत आर्यनच्या कुटुंबीयांनी कवठेमहांकाळ पोलिस ठाण्यात धाव घेतली. याप्रकरणी आर्यनच्या आईच्या तक्रारीवरुन मांत्रिकाविरोधात गुन्हा दाखल करण्याची त्यांनी मागणी केली.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com