भंडारदरापाठोपाठ निळवंडे काठोकाठ, प्रवरेला पूर

भंडारदरापाठोपाठ निळवंडे काठोकाठ, प्रवरेला पूर
प्रवरा नदीला पूरसाम टीव्ही

अहमदनगर ः मराठवाड्याची तहान नगर आणि नाशिक जिल्ह्यातील पाण्यावरच अवलंबून असते. त्यामुळे त्यांच्या नजरा कायम या दोन्ही जिल्ह्यांतील पाऊस आणि धरणाकडे लागलेल्या असतात. त्यांच्यासाठी यंदा गूड न्यूज आली आहे.

भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात वरुणराजाने पुन्हा हजेरी लावल्याने, उत्तर नगर जिल्ह्याला वरदान ठरणारे भंडारदरा धरण तब्बल एक महिना उशिराने पूर्ण क्षमतेने भरले. निळवंडे धरणही तांत्रिकदृष्ट्या भरल्याने, सुमारे २० हजार ६११ क्यूसेकने नदीपात्रात विसर्ग सोडण्यात आला आहे. या पावसाळ्यात प्रथमच प्रवरा नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. संगमनेर तालुक्यातील धांदरफळ ते ओझरपर्यंतचे चार पूल पाण्याखाली गेल्याने, परिसरातील गावांचा परस्परांशी संपर्क तुटला आहे.Many villages were cut off due to flooding of Pravara abn79

प्रवरा नदीला पूर
BREAKING Chandrakant Patil | चंद्रकांत पाटलांची उद्धव ठाकरेंवर टीका 'उद्धव ठाकरे हे डॉक्टर आहेत'

या वर्षी ऐन वेळी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने हुलकावणी दिल्याने भंडारदरा तब्बल एक महिना उशिराने भरले. कालपासून प्रवरापात्रात पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे संगमनेर तालुका हद्दीतील धांदरफळ बुद्रूक, धांदरफळ खुर्द, मिर्झापूर, नांदुरी, निमगाव पागा, खांडगाव, पेमगिरी, गोडसेवाडी, कवठे धांदरफळ, सांगवी तसेच संगमनेर अकोले तालुक्यातील ४० गावांना जोडणारे धांदरफळ बुद्रूक व कवठे धांदरफळ रामेश्वर दोन्ही पूल पाण्याखाली गेले आहेत.

संगमनेर शहराला संगमनेर खुर्दशी जोडणारा लहान पूल, मोठ्या पुलाखालील स्मशानभूमी, गंगामाई घाट परिसर पाण्याखाली गेला आहे. तसेच जोर्वे ते पिंपरणे पुलावरून पाणी वाहत आहे. डाव्या व उजव्या कालव्यातून प्रवरेच्या पाण्याचे सिंचन व पिण्यासाठी व्यवस्थापन करणारा ओझर बंधाऱ्याच्या भिंतीवरून सायंकाळी चार वाजता १८ हजार १४० क्यूसेकने पाणी नदीपात्रात झेपावले होते.

दोन्ही गाळमोऱ्यातून प्रत्येकी ३५९ क्यूसेक व डावा कालवाही ३४९ क्यूसेकने असे सुमारे २० हजार ९०१ क्यूसेक पाणी प्रवरापात्रातून वाहत आहे. यामुळे ओझर बुद्रूक व खुर्द गावांना जोडणारा छोटा पूल पाण्याखाली गेल्याने या परिसरातील कनोली, कनकापूर या गावांचा ओझर बुद्रुकशी संपर्क तुटला असून, नदीपात्रातील जगदंबा मातेची दोन्ही मंदिरे पाण्यात आहेत.

या वर्षी नदीपात्रात पाणी नसल्याने गणपती विसर्जनाची काळजी पडलेले संगमनेरकर यामुळे समाधानी झाले असून, नदीपात्राकडे जाणारे सर्व रस्ते बॅरिकेड्स लावून बंद करण्यात आले आहेत. तसेच आवश्यक ठिकाणी पोलिसांची मदत घेतली आहे. पुरापासून सावधगिरी बाळगण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.Many villages were cut off due to flooding of Pravara abn79

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com