मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी जाळला DYSP जायभायेंचा पुतळा

आज संतप्त झालेल्या मराठा आंदोलकांनी डिवायएसपी सुनील जायभाये (DYSP Sunil Jaybhaye) यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला असून घोषणाबाजी केली आहे.
मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी जाळला DYSP जायभायेंचा पुतळा
मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आंदोलनविनोद जिरे

बीड: अंबाजोगाईत डिवायएसपीवर (DYSP) निलंबनाची कारवाई करा, ही मागणी घेऊन मराठा क्रांती मोर्चाचे ठिय्या आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाचा आजचा पाचवा दिवस आहे, आज संतप्त झालेल्या मराठा आंदोलकांनी डिवायएसपी सुनील जायभाये (DYSP Sunil Jaybhaye) यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला असून घोषणाबाजी केली आहे. अंबाजोगाईत संगणक व्यवसायिक विलास यादव यांना, झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ, मागील चार दिवसांपासून मराठा क्रांती मोर्चाचे आंदोलन सुरू आहे.

मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी जाळला DYSP जायभाये यांचा पुतळा
मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी जाळला DYSP जायभाये यांचा पुतळाविनोद जिरे

विलास यादव यांच्या चुलत भावावर विनयभंग आणि ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल असल्याने ते फरार आहेत. त्यांचा शोध घेण्याच्या नावाखाली पोलिस त्यांच्या कुटुंबियांना वेठीस धरत आहेत. तर विलास यादव यांना स्वतः डिवायएसपी सुनील जायभाये यांनी, चौकशीच्या निमित्ताने बोलवून, अर्वाच्य जातीवाचक भाषा वापरून बेदम मारहाण केल्याचा आरोप आहे. त्यानंतर या घटनेचा निषेध म्हणून, मराठा क्रांती मोर्चाने सुनील जायभाये यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना निलंबित करा. या मागणीसाठी ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.

दरम्यान जोपर्यंत निलंबनाची कारवाई होत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याची भूमिका मराठा क्रांती मोर्चाने घेतली असून त्यामुळे आज पाचव्या दिवशीही आंदोलन सुरूच होते..

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com