Jalna Maratha Protest: जालन्यातील मराठा आंदोलकांवरील लाठीमार प्रकरण पोहोचलं हायकोर्टात; कुणी केली याचिका?

Jalna Maratha Protest: जालन्यातील आंदोलनकर्त्यांवर पोलिसांनी केलेल्या लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली आहे.
Jalna Maratha Protest
Jalna Maratha ProtestSaam tv

Jalna Lathicharge Case:

जालना लाठीमार प्रकरणावरून राज्यातील राजकारण चांगलं पेटलं आहे. जालन्यातील मराठा आंदोलकांवर लाठीमार झाल्यानंतर आंदोलनाचे नेतृत्व करणारे मनोज जरांगे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. पोलिसांच्या लाठीहल्ल्यात मराठा आंदोलक जखमी झाले होते. यावेळी पोलीस देखील जखमी झाले होते. आता हेच प्रकरण मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात पोहोचलं आहे. जालन्यातील आंदोलनकर्त्यांवर पोलिसांनी केलेल्या लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली आहे. (Latest Marathi News)

जालन्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा आंदोलनकर्त्यांवर पोलिसांनी केलेल्या लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका केली आहे. जालना लाठीहल्ला प्रकरणी अ‍ॅड. देविदास आर. शेळके यांनी 'पार्टी इन पर्सन' याचिका दाखल केली आहे.

अ‍ॅड. देविदास आर. शेळके यांनी सरकारवर आरोप करत याचिका दाखल केली आहे. अॅड. शेळके यांनी याचिकेवर दाखल पूर्व सुनावणी सोमवारी होणार आहे.

Jalna Maratha Protest
Snake In Chambal Express: पुंगी वाजवत धावत्या ट्रेनमध्ये सोडले साप; जीव वाचवण्यासाठी चंबळ एक्सप्रेसमध्ये प्रवाशांची धावपळ

अ‍ॅड. देविदास आर. शेळके यांनी याचिकेत काय म्हटलं आहे की, अंतरवाली सराटी येथे १ सप्टेंबर रोजी जवळपास १५०० पोलिस आणि राज्य राखीव दलाच्या जवानांनी शांततेत आंदोलन करणाऱ्या आंदोलनकर्त्यांवर अतिशय निर्दयी पद्धतीने लाठीहल्ला केला. आंदोलन उधळून लावण्यासासाठी आंदोलकांवर अश्रूधूरांच्या नळकांड्या फोडल्या. तसेच गोळीबार केला असल्याचे याचिकेत म्हटलं आहे.

Jalna Maratha Protest
Maratha Reservation Protest: संताप, जाब आणि घोषणाबाजी; मराठा तरुणांचा माजी मुख्यमंत्र्यांना घेराव; पाहा व्हिडिओ

'आंदोलकांच्या अंगावर छर्रे झाडण्यात आले. पोलिसांनी आंदोलनकर्त्यांवर घरात घुसून मारले. त्यामध्ये शंभरपेक्षा अधिक आंदोलक जखमी झाले. या अमानुष मारहाणीत अनेक आंदोलक गंभीररित्या जखमी झाले असल्याचे याचिकेत म्हटले आहे.

जीव वाचवण्यासाठी काही जणांनी पोलिसांवर दगडफेक केली. त्यात दहा-बारा पोलिस जखमी झालेत. त्याविरोधात पोलिसांनी सातशे पेक्षा अधिक आंदोलकांवर गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल केले, असेही याचिकेत म्हटलं आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com