मराठा आरक्षण : अशोक चव्हाण संजय राऊतांच्या भेटीला

फक्त अधिकार देऊन काही साध्य होणार नाही. केंद्राच्या सहकार्याची गरज आहे
मराठा आरक्षण : अशोक चव्हाण संजय राऊतांच्या भेटीला
मराठा आरक्षण : अशोक चव्हाण संजय राऊतांच्या भेटीलाsaam tv

विहंग ठाकूर

नवी दिल्ली : ''मराठा आरक्षण (Maratha Reservation) विषयी चर्चा करण्यासाठी मी आज संजय राऊत (Sanjay Raut) यांना भेटायला आलो आहे. काल मी मल्लिकार्जुन खडगे यांना सुद्धा भेटलो. शरद पवार यांची सुद्धा आधीच भेट घेतली. केंद्र सरकार जर आरक्षण करण्याचे अधिकार राज्यांना पुन्हा देत असेल तर त्या सोबत 50 टक्के आरक्षणाची मर्यादा सुद्धा उठवण्याची गरज आहे. कारण फक्त अधिकार देऊन काही साध्य होणार नाही. केंद्राच्या सहकार्याची गरज आहे.'' अशा शब्दांत मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी आपली भुमिका स्पष्ट केली आहे. (Maratha Reservation: Ashok Chavan met Sanjay Raut)

मराठा आरक्षण : अशोक चव्हाण संजय राऊतांच्या भेटीला
शिक्षक पात्रता परीक्षा आयोजनाला मान्यता

राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा शिगेला पोहचला आहे. न्यायालयात आरक्षण न मिळाल्यामुळे मराठा समाज चांगलाच आक्रमक झाला आहे. या पार्श्वभुमीवर आज अशोक चव्हाण यांनी दिल्लीत केंद्रिय नेते मल्लिकार्जुन खरगे, पी. चिदम्बरम यांची भेट घेतली. त्यानंतर आता अशोक चव्हाण संजय राऊत यांनाही भेटण्यासाठी पोहचले आहेत.

दरम्यान केंद्र सरकारची मराठा आरक्षणप्रकरणी १०२ व्या घटना दुरुस्तीची फेरविचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली. त्यानंतर आता केंद्र सरकारनेच मराठा समाजाचं मागासलेपण सिद्ध करुन त्यांना आरक्षणाबाबत निर्णय घेण्याचे सर्व अधिकार आता केंद्राकडे आहेत. आरक्षणासंदर्भातील अधिकार राज्यांना देण्यासाठी केंद्रसरकारनेच निर्णय घ्यावा, असे अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे.

Edited By- Anuradha

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com