
जालना : जालना (Jalna) जिल्ह्यात पुन्हा एकदा मराठा आरक्षणासाठी एल्गार पुकारण्यात आला आहे. आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी जिल्ह्यातील संपूर्ण भांबेरी गाव एकत्र आलं आहे. आज म्हणजे सोमवारी भांबेरी गावातील गावकऱ्यांनी तसेच तरुणांनी एकत्र येत मोठी रॅली काढली होती. या रॅलीत बैलगाडी ट्रॅक्टरसह हजारो मराठा बांधव सहभागी झाले होते. यावेळी एक मराठा लाख मराठा, जय भवानी जय शिवाजी अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. (Jalna Maratha Reservation News)
दरम्यान, यावेळी विविध मराठा आरक्षणासह विविध मागण्या करण्यात आल्या. मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे या प्रमुख मागणीसह कोपर्डीतील बहिणीला न्याय मिळाला पाहिजे. मराठा बांधवांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे तातडीने मागए घेण्यात यावेत. अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या. दरम्यान, केलेल्या मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर येत्या ८ ऑगस्टपासून संपूर्ण गाव आमरण उपोषणाला बसणार असा इशाराही यावेळी भांबेरी गावातील मराठा बांधवांनी दिला. (Jalna Bhamberi Maratha Reservation News)
ईएसबीसी 2014 आणि एसईबीसी 2018 हे दोन्ही कायदे रद्द झाल्यामुळे नियुक्तीपासुन वंचित राहिलेल्या मराठा तरुणांना सुपरन्युमरी पद्धतीने शासकीय सेवेत तत्काळ सामावुन घ्यावे, अशा विविध मागण्यांसाठी मराठा आरक्षणाचे याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी रविवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यावेळी विनोद पाटील यांनी याबाबत मुख्यमंत्र्यांना निवेदनही दिले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सविस्तर बाजू ऐकून घेतली. याबाबत लवकर निर्णय घेण्यात येईल, अशी ग्वाही दिली.
2014 आणि 2018 मध्ये मराठा आरक्षणासाठी दोन कायदे करण्यात आले, या कायद्यानुसार भरती प्रक्रियेमध्ये मराठा तरुणांनी भाग घेतला, पण त्यापैकी अनेकांना नियुक्ती मिळाली नाही. 23 डिसेंबर 2020 रोजी ईडब्ल्यूएस आरक्षण मराठा समाजाला पूर्वलक्षी प्रभावाने लागू करण्यात आले. हा निर्णय वेळ काढूपणाचा व समाजाची फसवणुक करणारा आहे. हे त्यावेळी सरकारला सांगितले होते. जो निर्णय न्यायालयात टिकत नाही हे सरकारला माहित असतानाही ईडब्ल्यूएस आरक्षण पूर्वलक्षी प्रभावाने लागू करण्याचा निर्णय घेतल्यामुळे सध्याच्या परिस्थितीत मराठा तरुणांमध्ये खूप नैराश्य व अस्वस्थता निर्माण झाली आहे, असेही निवेदनात म्हटले आहे.
Edited By - Satish Daud
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.