Kunbi Certificate: मराठवाड्यातील ९९ टक्के मराठ्यांना कुणबी दाखला मिळणं अशक्य? अभिलेख नोंदीतून धक्कादायक माहिती

Maratha Reservation Latest News: मराठवाड्यातील तब्बल ९९ टक्के मराठ्यांना कुणबी दाखला मिळणं सोपं नसल्याचं समोर आलं आहे.
मराठवाड्यातील मराठ्यांना कुणबी दाखला मिळणं कठीण
मराठवाड्यातील मराठ्यांना कुणबी दाखला मिळणं कठीणSaam TV

Maratha Reservation Kunbi Certificate: राज्यात एकीकडे मराठवाड्यातील मराठ्यांना कुणबी दाखला देण्याची मागणी जोर धरु लागली असतानाच, दुसरीकडे कुणबी प्रमाणपत्राबाबत अतिशय महत्वाची बातमी समोर आली आहे. मराठवाड्यातील तब्बल ९९ टक्के मराठ्यांना कुणबी दाखला मिळणं सोपं नसल्याचं समोर आलं आहे. (Latest Marathi News)

त्यामुळे मराठा समाजाच्या मागणीला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. अभिलेख नोंदीतून ही माहिती समोर आली आहे. मराठ्यांना आरक्षण मिळावं, तसेच त्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं, यासाठी जालन्यातील अंतरवाली सराटी गावात मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण सुरू आहे.

मराठवाड्यातील मराठ्यांना कुणबी दाखला मिळणं कठीण
Ajit Pawar News: मोठी बातमी! अजित पवार गटाचं ट्विटर अकाऊंट सस्पेंड; समोर आलं मोठं कारण...

आज त्यांच्या उपोषणाचा १६ वा दिवस असून जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही, तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. दरम्यान, मराठवाड्यातील कुणबी-मराठा समाजाच्या नोंदी शोधा, असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी दिले होते.

त्यानुसार, निजामकालीन नोंदी शोधण्यासाठी अधिकाऱ्यांची एक समिती देखील गठीत करण्यात आली. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर मराठवाड्यातील १९६७ पर्यंतच्या ३४ लाख अभिलेखांचा अभ्यास करण्यात आला.

यापैकी केवळ ४ हजार १६० अभिलेखांवर कुणबी नोंद (Kunbi Certificate) आढळली आहे. याचा अर्थ असा की, निजामकालीन वंशावळीच्या आधारे सरसकट मराठा समाजाला आरक्षणाचा लाभ होणार नाही. सरकारने जर जीआर बदलला नाही, तर मराठवाड्यातील तब्बल ९९ टक्के मराठ्यांना कुणबी म्हणून आरक्षण मिळणार नसल्याचं अभिलेख तपासातून सिद्ध होतंय.

मराठवाड्याच्या आठही जिल्ह्यांतील हक्क नोंदणी, शेतवार पुस्तक, प्रवेश निर्गम उतारा तपासणीनंतर ही आकडेवारी समोर आली आहे. सध्या मराठवाड्यात कुणबी समाजाची लोकसंख्या सुमारे १ कोटी २० लाख इतकी असल्याची माहिती आहे.

मात्र गेल्या ५ वर्षांत केवळ ६३२ जणांनी कुणबी प्रमाणपत्रासाठी अर्ज केल्याचं दिसून आलं आहे. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्यात मंगळवारी फोनवरून ५ मिनिटे चर्चा झाली. यानंतर मनोज जरांगे यांनी माध्यमांसोबत संवाद साधला.

"मुख्यमंत्र्यांसोबत दोन्ही समित्याबाबत चर्चा झाल्या. त्यांना आम्ही एक महिन्याचा वेळ दिला. मुख्यमंत्र्यांनी उद्या उपोषण सोडवण्यासाठी येणार असल्याचं आश्वासन दिलं आहे. एक महिना दिला म्हणजे दिला. सरकारने आता त्यावर निर्णय घ्यावा. उद्या मुख्यमंत्री आले तर उपोषण सोडू तसा शब्द दिला आहे", असं जरांगे म्हणाले.

Edited by - Satish Daud

मराठवाड्यातील मराठ्यांना कुणबी दाखला मिळणं कठीण
Maharashtra Rain Alert: राज्यात पावसाचा जोर वाढणार; बैलपोळ्याच्या दिवशी 'या' जिल्ह्यांमध्ये बरसणार

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com