Maratha Reservation : संभाजी राजे घेणार राष्ट्रपतींची भेट
Maratha Reservation AgitationSaamtv

Maratha Reservation : संभाजी राजे घेणार राष्ट्रपतींची भेट

मराठा आरक्षणप्रश्नी खा.संभाजीराजे उद्या राष्ट्रपतींची भेट घेणार आहेत. या भेटीला महाराष्ट्रातील सर्वपक्षीय प्रतिनिधींचे शिष्टमंडळ संभाजीराजेंसोबत असणार आहे.

दिल्ली : मराठा आरक्षणाचा प्रश्न राष्ट्रपतींपुढे मांडून मराठा समाजाला असलेली आरक्षणाची गरज व समाजाच्या भावना राष्ट्रपतींपर्यंत पोहोचविण्यासाठी खासदार छत्रपती संभाजीराजे हे उद्या, दि. २ सप्टेंबर रोजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेणार आहेत. राष्ट्रपतींच्या भेटीकरता खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी महाराष्ट्रातील चारही प्रमुख पक्षांना त्यांचे प्रतिनिधी पाठविण्याचे आवाहन केले होते.

हे देखील पहा -

त्यांच्या आवाहनास प्रतिसाद देत महाराष्ट्रातून शिवसेना खासदार विनायक राऊत, भाजपचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार वंदना चव्हाण, व कॉंग्रेसतर्फे राज्यातील एकमेव खासदार बाळू धानोरकर हे उपस्थित राहणार आहेत. मात्र, धानोरकर आजारी असल्याने भोरचे आमदार संग्राम थोपटे हे त्यांच्या पक्षाचे प्रतिनिधी म्हणून संभाजीराजेंच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळात सहभागी होणार आहेत.

छत्रपती संभाजीराजे यांनी सुरूवातीपासूनच मराठा आरक्षण लढ्यात सक्रीय भूमिका घेतली असून, रस्त्यावरील लढाईपासून ते न्यायालयीन लढाईपर्यंत सर्व स्तरांवर ते प्रयत्नशील आहेत. मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडविण्याची जबाबदारी कुण्या एकाची नसून सर्व पक्षांनी एकत्र येऊन यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करण्याची गरज असल्याचे खा. संभाजीराजेंनी वेळोवेळी बोलून दाखवले आहे. आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी पक्षीय राजकारणाला बगल देत संभाजीराजे सर्व पक्षांमध्ये राजकीय समन्वय घडवून आणत आहेत.

Maratha Reservation Agitation
आर्थिक स्थिती खालावल्याने उच्चशिक्षित दांपत्याने वडिलांना पाठवले वृद्धाश्रमात!

संसदेत १२७ व्या घटनादुरूस्तीवर बोलताना संभाजीराजे यांनी मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकार व केंद्र सरकारची जबाबदारी देखील स्पष्ट केली. या घटनादुरूस्तीनंतर मराठा समाजाला शैक्षणिक व सामाजिक मागास ठरवून, असाधारण परिस्थिती असल्याचे सिद्ध करून ५०% आरक्षण मर्यादेच्या वरती आरक्षण देण्याची जबाबदारी राज्य सरकारची असल्याचे स्पष्ट आहे. त्यामुळे आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर सर्वपक्षीय शिष्टमंडळासह खासदार संभाजीराजे घेत असलेल्या राष्ट्रपतींच्या भेटीकडे सर्व राजकीय व सामाजिक वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Edited By : Krushnarav Sathe

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com