Governor Koshyari Remark Row |मुंबईचा, मराठी असल्याचा अभिमान; अभिनेते सचिन पिळगावकरांची प्रतिक्रिया

कोश्यारींच्या वक्तव्यावर जेष्ठ नेते अभिनेते सचिन पिळवगावकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Sachin Pilgaonkar
Sachin PilgaonkarSaam tv

नागपूर : राज्यपाल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी मुंबई आणि महाराष्ट्राबद्दल केलेल्या वक्तव्यावरून राज्यातलं राजकारण चांगलंच तापलं आहे. राज्यापाल कोश्यारींच्या वक्तव्यावरून राजकीय वर्तुळातील नेत्यांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. त्यानंतर आता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या वक्तव्यावर मराठी सिनेसृष्टीतून देखील प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. कोश्यारींच्या वक्तव्यावर जेष्ठ नेते अभिनेते सचिन पिळवगावकर (Sachin Pilgaonkar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ( Sachin Pilgaonkar News In Marathi )

Sachin Pilgaonkar
जान्हवीनं 'या' अभिनेत्याला विकलं तिचं अलिशान घर; किंमत ऐकून सर्वसामान्यांचे डोकेच चक्रावून जाईल

शुक्रवारी मुंबईच्या अंधेरी येथील एका कार्यक्रमात 'गुजराती लोक मुंबईतून गेले, तर पैसे राहणार नाहीत. आर्थिक राजधानी म्हणून मुंबईची ओळख आहे, ती राहणार नाही', असे वक्तव्य राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलं. राज्यपाल कोश्यारींच्या या वक्तव्यानंतर त्यांच्यावर चहूबाजूंनी टीका झाल्यानंतर त्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. मुंबई, महाराष्ट्रावर प्रेम करणाऱ्या मराठी सिनेसृष्टीतील कलाकारांकडून प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

Sachin Pilgaonkar
Kareena Kapoor Khan : तिसऱ्यांदा प्रेग्नंट असल्याच्या चर्चेवर करीना कपूर संतापली; म्हणाली, 'मी मशीन आहे का?'

राज्यपालांच्या वक्तव्यानंतर अभिनेते सचिन पिळगावकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पिळगावकर म्हणाले, 'याबद्दल आम्हाला फारसं माहित नाही. त्यांनी असे का म्हटलं हे त्यांना माहित आहे. ते स्वत: खुलासा करतील. आमचं काहीचं म्हणणं नाही. कुठल्याही राजकीय गोष्टीशी आमचा संबंध नाही. राजकारण आमचा बाज नाही. आम्हाला मुंबईचा, मराठी असल्याचा अभिमान आहे'.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com