मराठी कामगार सेनेच्या ऍपचे राज ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन

महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रणित मराठी कामगार सेनेच्या मोबाईल ऍपचे उद्घाटन उद्या गुरुवार दिनांक २२ जुलै रोजी मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्या हस्ते सकाळी ११ वाजता कृष्णकुंज येथून होणार आहे.
मराठी कामगार सेनेच्या ऍपचे राज ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
मराठी कामगार सेनेच्या ऍपचे राज ठाकरेंच्या हस्ते उद्घाटनSaam Tv

महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रणित मराठी कामगार सेनेच्या मोबाईल ऍपचे उद्घाटन उद्या गुरुवार दिनांक २२ जुलै रोजी मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्या हस्ते सकाळी ११ वाजता कृष्णकुंज येथून होणार आहे.Marathi Kamgar Sena app inaugurated by Raj Thackeray

महाराष्ट्रातील मराठी कामगार बंधू भगिनींच्या अडीअडचणी आणि प्रश्नांसाठी मनसे प्रणित मराठी कामगार सेना गेल्या पाच वर्षांपासून सातत्याने कार्यरत असून कोरोनाच्या गेल्या दीड वर्षाच्या काळात मराठी कामगार सेने Marathi Kamgar Sena मार्फत अनेक कामगारांना मदत करण्यात आली आणि न्याय मिळवून दिला त्यांच्या पगारापासून ते आरोग्य विषयक समस्या सोडवण्यासाठी मराठी कामगार सेना या कामगारांच्या पाठिशी भक्कमपणे उभी राहिली असल्याचही मराठी कामगार सेनेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं.

तसेच बदलत्या काळानुसार आणि तंत्रज्ञानानुसार Technology आता मराठी कामगार सेनेने कामगार बंधू भगिनींच्या सोयीसाठी त्यांना मदत व्हावी यासाठी मराठी कामगार सेनेचा ऍप App बनवला आहे. हा ऍप डाउनलोड केल्या नंतर कामगारांना मराठी कामगार सेने विषयी इत्यंभूत माहिती मिळणार आहे. तसेच कामगार विषयक कायदेसुध्दा Law कामगारांना समजणार आहेत त्यामुळे कामगारांमध्ये जागृती निर्माण होण्यास मदत होणार आहे.

तसेच कामगारांना काही ही अडचणी असतील त्यांच्या काही सूचना असतील तरी कामगार ऍप वर जाऊन त्या मांडू शकतात त्याची तात्काळ मराठी कामगार सेने मार्फत नोंद घेतली जाईल आणि त्यावर काम ही केले जाईल. असही त्यांनी सांगितलं.

मराठी कामगार सेनेच्या ऍपचे राज ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
कोविड सेंटरमधील खिडकीचे गज कापून कैद्याचे पलायन!

ऍप सोबतच या संदर्भात मराठी कामगार सेनेच्या कार्यालयाकडून कामगारांना संपर्क साधून ही माहिती देण्यात येईल. तसेच या ऍपच्या द्वारे मराठी कामगारांना मराठी कामगार सेनेचे प्राथमिक सदस्यत्व ही स्वीकारता येणार असल्याचे मराठी कामगार सेनेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

Edited By - Jagdish Patil

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com