Nashik News: टोलनाक्यावर दोन महिला एकमेकींना भिडल्या; नाशकात नेमकं काय घडलं?

पिंपळगाव बसवंत टोलनाका पुन्हा नव्या वादाने चर्चित आला आहे.
Nashik News
Nashik NewsSaam Tv

तबरेज शेख

नाशिक - पिंपळगाव बसवंत टोलनाका पुन्हा नव्या वादाने चर्चित आला आहे. बुधवारी सायंकाळी टोल भरण्याच्या किरकोळ कारणाहून महिला टोल कर्मचारी आणि पोलीस पत्नी यांच्यात टोल भरण्यावरून हानामारीचा प्रकार घडला. घटनेच व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) चांगलाच व्हायरल झाला आहे.

हे देखील पाहा -

निफाड तालुक्यातील सीआरपीएफ जवान आपल्या पत्नी व दोन मुलांसमवेत पुणे येथे जात असताना बुधवारी सायंकाळच्या सुमारास पिंपळगाव बसवंत टोलनाक्यावर आपले शासकीय कार्ड दाखवून खाजगी वाहन सोडण्याची विनंती केली. टोलनाक्यावरील महिला कर्मचाऱ्यांनी तुम्हाला टोल भरवाच लागेल कार्ड चालणार नाही. सदर पोलीस कर्मचाऱ्याने पैसे देऊन टोल भरल्यानंतर वाहनात बसलेली पोलीस पत्नी व महिला टोल कर्मचाऱ्यात शाब्दिक बाचाबाची झाली.

Nashik News
VIDEO: लहान मुलीचा 'सामी-सामी'वर अफलातून डान्स; पुष्पाच्या श्रीवल्लीलाही मग राहावलं नाही!

वाद विकोपाला गेल्याने दोन्ही महिलांमध्ये टोलनाक्यावर तुंबळ हाणामारी झाली. काही वेळानंतर प्रकरण पोलीस ठाण्यात पोहचल्यानंतर टोल कर्मचारी यांनी सुरवातीला गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. पोलीस प्रशासनाने दोन्ही तक्रारदार यांच्या बाजू ऐकून घेतल्यानंतर परस्पर वाद मिवटवीत सबुरीचा सल्ला दिला. या हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून यामुळे पिंपळगाव टोलनाका मात्र हाणामारीसाठीच प्रसिद्ध झाल्याचे या घटनेवरून दिसून येत आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com