Marathwada Rain: मुसळधार पावसाचा फटका; दोन दिवसात 31 जणांचा बळी

राज्याच्या मराठवाडा भागाला मुसळधार पावसाचा जबर फटका बसला आहे. तर या दोन दिवसात तब्बल ३१ जणांचा बळी गेल्याची माहिती मिळत आहे.
Marathwada Rain: मुसळधार पावसाचा फटका; दोन दिवसात 31 जणांचा बळी
Marathwada Rain: मुसळधार पावसाचा फटका; दोन दिवसात 31 जणांचा बळीSaam Tv

औरंगाबाद : राज्याच्या मराठवाडा Marathwada भागाला मुसळधार पावसाचा जबर फटका बसला आहे. तर या दोन दिवसात तब्बल ३१ जणांचा बळी गेल्याची माहिती मिळत आहे. तर पाच जण अद्याप बेपत्ता आहेत. फक्त औरंगाबाद Aurangabad जिल्ह्यात तब्बल ४ जणांचा मृत्यू झाला, तर नांदेड Nanded जिल्ह्यात ७ जणांनी प्राण गमवावे आहेत. मराठवाड्यात १२० ते १५० पाळीव प्राण्यांचा मृत्यू झाला आहे. तर तीन लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचे समोर आले आहे.

हे देखील पहा-

औरंगाबादमध्ये पावसाचे रौद्र रुप

पावसाची रिपरिप औरंगाबादेत ०७ सप्टेंबर रोजी दिवसभर सुरु होती. मात्र संध्याकाळी ७.१० वाजता मुसळधार पावसाला सुरुवात झाली होती. विजांचा कडकडाट आणि ढंगांच्या कडकडाटात काही काळ पाऊस चालूच होता. या मुसळधार कोसळणाऱ्या पावसामुळे औरंगाबाद जिल्ह्यात पिकाचे Crops मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

Marathwada Rain: मुसळधार पावसाचा फटका; दोन दिवसात 31 जणांचा बळी
जुन्या वादातून युवकाची हत्या; दोन आरोपी पोलिसांच्या ताब्यात

पिशोर परिसरात पिकांचे नुकसान;

कन्नड Kannad तालुक्यातील पिशोर भागात अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले. अंजना-पळशी मध्यम प्रकल्प ओसंडून वाहत होते. परिणामी अंजना नदीला पूर आला. त्यामुळे दहा गावांचा संपर्क तुटला होता. सोमवारी रात्रीपासून पिशोरला मुसळधार पाऊस होत होता. त्यामुळे पुलावरून मोठ्या प्रमाणावर पाणी वाहू लागले.

Edited By-Sanika Gade

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com