Electricity Bill : मराठवाड्यातील नेत्यांनीच थकवली लाखोंची वीज बिलं; कुणाकडे किती थकबाकी? वाचा सविस्तर...

मराठवाड्यातील अनेक राजकीय नेत्यांकडे लाखो रुपयांची वीज बिल थकबाकी असल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे.
Electricity Bill
Electricity Bill Saam Tv

औरंगाबाद : ऐन रब्बीचा हंगाम सुरू असताना वीज बिल (Electricity Bill) न भरल्याने मराठवाड्यातील अनेक शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन कट केले जात आहे. कारवाई टाळण्यासाठी थकीत वीजबिलाची रक्कम भरा, असे सरकारकडून सांगण्यात आलं आहे. अशातच मराठवाड्यातील अनेक राजकीय नेत्यांकडे लाखो रुपयांची वीज बिल थकबाकी असल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. (Latest Marathi News)

Electricity Bill
Gram Panchayat Election : सरपंचपदाचे आरक्षण रद्द करा; उच्च न्यायालयात याचिका, सोमवारी येणार निर्णय

त्यामुळे पुढाऱ्यांना न्याय आणि शेतकऱ्यांवर अन्याय अशाच प्रकारचं चित्र दिसून येत आहे. आधीच झालेल्या अतिवृष्टीने मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे कंबरड मोडलंय. खरीपाचा हंगाम पूर्णपणे हातातून गेल्यानंतर आता किमान रब्बी पिकांमधून काहीतरी हातात येईल, या आशेवर शेतकरी आहे. (Maharashtra Politics News)

मात्र, ऐन रब्बीचा हंगाम सुरू असताना महावितरणकडून शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन कापले जात आहे. अशातच मराठवाड्यातील राजकीय नेत्यांनी मात्र, लाखो रुपयांची वीज बिलं थकवली आहे. ही बाब उघडकीस येताच, शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान, कोणत्या राजकीय नेत्यांकडे किती वीज बिल थकलं आहे जाणून घेऊया...

Electricity Bill
CM Eknath Shinde : शिंदे-फडणवीस सरकारला हायकोर्टाचा दणका; 'त्या' निर्णयाला दिली स्थगिती

अथविराग पदमसिंग पाटील (उस्मानाबाद)

ग्राहक क्रमांक: 590140077625

थकीत रक्कम: 2 लाख 23 हजार 900

मागील महिन्याचं बील:

योगेश भारतभूषण क्षीरसागर (बीड)

ग्राहक क्रमांक: 576130312721

थकीत रक्कम 1 लाख 45 हजार 660

मागील महिन्याचं बील:

बबनराव दत्ताराव यादव-लोणीकर ( भाजप आमदार)

ग्राहक क्रमांक: 524220001520

थकीत रक्कम 84 हजार 730

मागील महिन्याचं बील:

प्राजक्ता सुरेश धस (आमदार धस यांच्या पत्नी)

ग्राहक क्रमांक: 572980031334

थकीत रक्कम: 44 हजार 460

मागील महिन्याचं बील:

संदिप रविंद्रजी क्षीरसागर ( राष्ट्रवादी आमदार)

ग्राहक क्रमांक: 576130302458

थकीत रक्कम: 1 लाख 2 हजार 160

मागील महिन्याचं बील:

धनंजय पंडितराव मुंडे (राष्ट्रवादी आमदार)

ग्राहक क्रमांक: 586480349169

थकीत रक्कम: 60 हजार 130

मागील महिन्याचं बील:

प्रीतम गोपीनाथरावजी मुंडे (भाजप खासदार)

ग्राहक क्रमांक: 585130006807

थकीत रक्कम : 72 हजार 610

मागील महिन्याचं बील:

मुंदडा अक्षय नंदकिशोर

ग्राहक क्रमांक : 582560464869

थकीत रक्कम : 1 लाख 64 हजार 980

मागील महिन्याचं बील:

मधुसूदन माणिकराव केंद्रे

ग्राहक क्रमांक: 536620069636

थकीत रक्कम: 85 हजार 670

मागील महिन्याचं बील:

भीमराव आनंदराव धोंडे

ग्राहक क्रमांक: 573180001140

थकीत रक्कम : 1 लाख 57 हजार 420

मागील महिन्याचं बील:

शिवाजीराव पंडित

ग्राहक क्रमांक: 576010059576

थकीत रक्कम : 1 लाख 13 हजार 960

मागील महिन्याचं बील:

विलास संदीपन भुमरे ( मंत्री भुमरे यांचे पुत्र)

ग्राहक क्रमांक: 493260467413

थकीत रक्कम: 1 लाख 31 हजार 160

मंगलाबाई प्रकाशराव सोळंके

ग्राहक क्रमांक: 585180002292

थकीत रक्कम : 1 लाख 63 हजार 270

मागील महिन्याचं बील:

Edited By - Satish Daud

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com