मराठवाडा विद्यापीठाचा पाच महाविद्यालयांना दणका; ठाेठावला दाेन लाखांचा दंड

औरंगाबादेत महाविद्यालयांवर मोठी कारवाई; नियम, निकषांचे उल्लंघनचा ठपका
Aurangabad News
Aurangabad NewsSaam Tv

औरंगाबाद - नियम, निकषांचे उल्लंघन करणाऱ्या आणखी पाच महाविद्यालयांवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा (Marathwada) विद्यापीठाने मोठी कारवाई केली आहे. चालू शैक्षणिक वर्षापासून पदवी आणि पदव्युत्तरच्या काही अभ्यासक्रमांसाठी विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येवू नये, तसेच महाविद्यालयांनी दोन लाख रुपयांचा दंड १५ दिवसांत जमा करावा, असे आदेश देण्यात आले आहेत.

हे देखील पाहा -

तसे पत्रच संबंधित महाविद्यालयांच्या प्राचार्यांना कुलगुरु डॉ. प्रमोद येवले यांनी पाठवले. विद्यापीठाशी संलग्नित नऊ महाविद्यालयांची पडताळणी झाल्यानंतर त्यातील पाच महाविद्यालयांना कुलगुरु डॉ. येवले यांच्यासमोर २१ जुलैला म्हणणे मांडण्याची संधी देण्यात आली होती. खुलताबादच्या कोहिनूर कॉलेजमध्ये अनियमितता, भौतिक सुविधांचा अभाव समोर आल्याने त्यावर कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर आता नव्याने पाच महाविद्यालयांतील काही अभ्यासक्रमांचे प्रवेश रोखण्यात आले आहेत.

गुणवत्ता ढासाळणाऱ्या, नो ग्रेड, ग्रेड घसरलेल्या, पदव्युत्तरचे अधिकचे प्रवेश अशा ७० महाविद्यालयांची यादी तयार केली आहे. पहिल्या दहा महाविद्यालयांवरीव कारवाईनंतर पुढच्या टप्प्यात १२ महाविद्यालयांची पडताळणी होणार आहे.

Aurangabad News
Night skin care : रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्याला हे लावा, मिनिटांत येईल ग्लो

कोणते महाविद्यालय आहेत?

1) खुलताबाद येथील उर्दु एज्युकेशन सोसायटीचे चिश्‍तिया कला महाविद्यालय

2) बदनापुर (जि. जालना) येथील निर्मल क्रीडा व समाज प्रबोधन ट्रस्टचे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय,

3)भोकरदन (जि. जालना) येथील रोकडा हनुमान प्रतिष्ठान व बहुउद्देशीय संस्थेचे कै. ॲड. श्रीनिवासरावजी दगडूरावजी देशमुख संगणक व व्यवस्थापन महाविद्यालय

4) धावडा, (ता. भोकरदन, जि. जालना) 5) फर्दापूर-धनवट (ता. सोयगाव, जि. औरंगाबाद) येथील राजकुंवर महाविद्यालयावर ही कारवाई करण्यात आली आहे.

या महाविद्यालयातील काही अभ्यासक्रम, तुकड्या बंद करण्यात आल्या आहेत. तर, काहींची प्रवेश क्षमता घटवण्यात आली आहे. काही महाविद्यालयांना त्रुटी सुधारण्यासाठी सवलतही देण्यात आली आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com