Parbhani News: सासरच्या जाचाला कंटाळून 28 वर्षीय विवाहितेची आत्महत्या, सहा जणांवर गुन्हा दाखल

नाजियाचं लग्न साबेरखान कलंदरखां याच्याबरोबर 10 वर्षापूर्वी झाले होते.
Parbhani News
Parbhani News

परभणी : सासरच्या जाचाला कंटाळून २८ वर्षीय विवाहितेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना जिंतूर तालुक्यातील चारठाणा येथे समोर आली आहे. नाजिया साबेरखान असं विवाहित मृत महिलेचं नाव आहे. नाजियाने घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.

परभणी येथील शेख अफसर यांची मुलगी नाजिया हिचे लग्न जिंतूर तालुक्यातील चारठाणा येथील साबेरखान कलंदरखां याच्याबरोबर 10 वर्षापूर्वी झाले होते. काही दिवस चांगले राहिल्यानंतर किरकोळ कारणावरून सासरचे लोक तिला मानसिक व शारीरिक त्रास देऊ लागले.

Parbhani News
Thane News : ठाणेकरांनो सावधान! ठाण्यात H3N2चा पहिला मृत्यू ; रुग्णांचा आकडा १९ वर

माहेरहून पैसे घेऊन ये असेही नेहमी सांगत होते. वेळोवेळी सासरच्यांना समजावून सांगितले पण त्यांचा जाच कायमच राहिला. खरेदी केलेल्या प्लॉटच्या रजिस्ट्रारसाठी माहेरहून पैसे घेऊन ये, यासाठी तिला त्रास दिला जात होता. या नेहमीच्या जाचास कंटाळून नाजियाने आत्महत्या केली. (Latest News)

या प्रकरणी मयत नाजियाचा भाऊ शेख अशफाक शेख अफसर याने दिलेल्या तक्रारीवरुन नाजियाचा पति साबेरखान कलंदरखां, दिर जाबेरखां कलंदरखां, साकेरखां कलंदरखां, शब्बीरखां कलंदरखां, नंणंद परवीन खालेद, जाव सिमा जब्बारखां या सहा जणांविरूद्ध चारठाणा पोलीस ठाण्यात 498,306,324,34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Parbhani News
Ambarnath News: खड्ड्यात पडून दोन लहानग्यांचा बुडून मृत्यू, ठेकेदारावर कारवाईची नागरिकांची मागणी

गुन्हा दाखल झाल्याशिवाय प्रेत ताब्यात घेणार नसल्याचे मयताच्या नातेवाईकांचे म्हणणे होते. पोस्टमॉर्टम झाल्यानंतर काल दिवसभर प्रेत जिंतूर येथील ग्रामीण रुग्णालयातच होते. गुन्हा दाखलची प्रक्रिया संपल्यावर रात्री प्रेत नातेवाईकांनी ताब्यात घेतले. तसेच गुन्हा दाखल होताच पोलिसांनी आरोपी साबेर खानला अटक केली. पुढील तपास चारठाणा पोलीस करत आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com