Crime: मिटकलवाडीत विवाहितेचा खून‌ करून मृतदेह विहीरीत टाकल्याने खळबळ

अंजली हणमंत सुरवसे असं खून झालेल्या विवाहितेचे नाव आहे.
Crime: मिटकलवाडीत विवाहितेचा खून‌ करून मृतदेह विहीरीत टाकल्याने खळबळ
Crime NewsSaam tv

पंढरपूर - माढा तालुक्यातील मिटकलवाडी येथे एका विवाहित महिलेची हत्या करून तीचा मृतदेह विहीरीत फेकून देण्यात आला. त्यानंतर सासरच्या लोकांनी तीने आत्महत्या केली असा भास निर्माण केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. या प्रकरणी टेंभूर्णी पोलीस (Police) ठाण्यात पती हणमंत सुरवसे सह इतर सहा जणांविरोधात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंजली हणमंत सुरवसे असं खून झालेल्या विवाहितेचे नाव आहे.

हे देखील पाहा -

अंजली सुरवसे या विवाहितेचा लग्नातील राहिलेल्या 50 हजार रूपये हुंड्यासाठी सासरच्या लोकांकडून छळ सूरू होता. माहेरच्या लोकांनी‌ हुंड्याची राहिलेली रक्कम दिल्यानंतर पुन्हा दोन‌ लाख रूपये आणण्यासाठी तीला सतत शारिरीक आणि मानसिक त्रास दिला जात होता. यातूनच 30 मे रोजी विवाहित महिला अंजली हिचा खून करून तीचा मृतदेह शेतातील विहीरीत टाकला होता.

Crime News
'मी हार मानली नाही', भाजी विक्रेत्याची मुलगी बनली न्यायाधीश

दरम्यान अंजली हिने आत्महत्या केली असा सासरच्या लोकांनी भास निर्माण केला होता. याच वेळी अंजलीच्या नातेवाईकांनी मात्र तीच्या मृत्यू विषयी शंका व्यक्त केली होती. पोलीस तपासात व शवविच्छेदनमामध्ये तिची आत्महत्या नसून तीचा खून करून मृतदेह विहीरीत टाकून दिल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. त्यानंतर आरोपी पती,सासू सह इतर सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.