महिलेने सुखी संसाराचा केला बट्याबोळ; Boyfriend साठी पतीला पण...

एका विवाहित महिलेने प्रियकराकरिता आपल्या सुखी संसाराचा बट्याबोळ केला आहे. तिने प्रियकाराशी लग्न करता यावे, याकरिता पतीला सोडून दिले आहे
महिलेने सुखी संसाराचा केला बट्याबोळ; Boyfriend साठी पतीला पण...
महिलेने सुखी संसाराचा केला बट्याबोळ; Boyfriend साठी पतीला पण...Saam Tv

नागपूर : नागपुर मधील वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये एक विचित्र घटना घडली आहे. या ठिकाणी एका विवाहित महिलेने प्रियकराकरिता आपल्या सुखी संसाराचा बट्याबोळ केला आहे. तिने प्रियकाराशी लग्न करता यावे, याकरिता पतीला सोडून दिले आहे. पण ऐनवेळी प्रियकराने लग्नाला नकार दिल्याने महिलेची इकडे आड तिकडे विहीर अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

हे देखील पहा-

याप्रकरणी आपली फसवणूक झाल्यावर पीडित विवाहित महिलेने वाठोडा पोलीस ठाण्यात प्रियकरा विरोधामध्ये गुन्हा दाखल FIR केला आहे. या घटनेचा पुढील अधिक तपास पोलीस करत आहे. नागपुरातील वाठोडा पोलीस ठाण्याच्या परिसरात रहिवासी असणाऱ्या 30 वर्षीय फिर्यादी महिला एका इन्शुरन्स कंपनीमध्ये काम करत होती. पीडित महिला ही विवाहित असून त्यांना ५ वर्षांचा एक मुलगा देखील आहे.

पण इन्शुरन्स कंपनीमध्ये काम करत असताना अभय सुरेश जैस्वाल नावाच्या २८ वर्षीय युवकाबरोबर फिर्यादी बरोबर ओळख झाली. आणि कालांतराने दोघांच्या ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले होते. दोघांनी देखील लग्नाचा विचार केला होता. पण फिर्यादीचा पती दोघांच्या लग्नात अडसर ठरत होता. यामुळे आरोपी अभय याने तिला पतीला सोडून देण्यास सांगितले होते.

महिलेने सुखी संसाराचा केला बट्याबोळ; Boyfriend साठी पतीला पण...
Mumbai Police चे काम कौतुकास्पद! नाल्यातून वाहत जाणाऱ्या बाळाचे वाचवले प्राण; मांजराच्या आवाजाने लोकं झाले Alert

प्रियकराच्या प्रेमात आंधळी झालेल्या महिलेने कोणत्याही प्रकारचा विचार न करता प्रियकराकरिता आपल्या पतीला टाळण्यास सुरुवात केली होती. त्यानंतर पतीपासून विभक्त होऊन, आपल्या मुलाबरोबर एकटी राहू लागली होती. दरम्यान आरोपीने वेळोवेळी पीडितेचे लैंगिक शोषण करत असत. दिघोरी या ठिकाणी असलेल्या एका हॉटेलमध्ये घेऊन जात तिच्यावर बलात्कार करत असत.

Edited By- Digambar Jadhav

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com