नागपूरात दहावीच्या विद्यार्थ्यांने बनवले मास्क डिटेक्टर

मास्क न घालणारे डिटेक्ट होईल आणि सायरन वाजून त्याची माहिती कळेल.
नागपूरात दहावीच्या विद्यार्थ्यांने बनवले मास्क डिटेक्टर
नागपूरात दहावीच्या विद्यार्थ्यांने बनवले मास्क डिटेक्टरसंजय डाफ

नागपूर - कोरोना Corona काळात मास्क घालणे सर्वात महत्वाचे असले तरी अनेकांना याचं गांभीर्य नाही. अनेकजण मास्कच Mask घालत नाहीत तर अनेकजण व्यवस्थित मास्क घालत नाही. प्रत्येकाला मास्क घाला हे सांगणे किंवा हे सांगायला कर्मचारी ठेवणं सोपं नाही. त्यामुळे यावर उपाय म्हणून नागपुरातील Nagpur दहावीच्या विद्यार्थ्याने मास्क डिटेक्टर तयार केले आहे. यात मास्क न घालणारे डिटेक्ट होईल आणि सायरन वाजून त्याची माहिती कळेल.

हिमांशू चौरागडे असे या तरुणाचे नाव आहे. हिमांशू दहाव्या वर्गात आहे. मात्र त्याने आवल्या चिकित्सक स्वभावातून मास्क डिटेक्टर सॉफ्टवेअर तयार केले आहे. यात ज्यांनी मास्क घातलाच नाही, किंवा व्यवस्थित घातला नाही, त्याचा चेहरा डिटेक्स होऊन सायरन वाजेल, त्यामुळे त्या व्यक्तीला मास्क घालावे लागेल किंवा त्यांना मास्क घालण्याची विनंती केली जाईल. लॉकडाऊन दरम्यान अनेक लोकं मास्क घालत नव्हते. कारवाई करूनही लोकं ऐकायला तयार नाही. त्यामुळे यावर उपाय हिमांशू ने हे मास्क डिटेक्टर तयार केले आहे. यासाठी त्याने आर्टिफिशिअल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंगचा अभ्यास केला.

हिमांशू लहानपणापासून चिकित्सक वृत्तीचा आहे. VNIT मध्ये दरवर्षी शालेय विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या प्रयोगाचे प्रदर्शन आयोजित केले जाते. या प्रदर्शनात हिमांशू आणि त्यांच्या मित्रांनी तयार केलेल्या प्रयोगाला पारितोषिक मिळते. यातूनच त्याच्यात वेगवेगळ्या प्रयोगाबद्दल आवड निर्माण झाली. त्यातूनच तो नवनवीन प्रयोग करत असल्याचे त्याचे आई वडील सांगतात.


हिमांशूने तयार केलेलं मास्क डिटेक्टर सार्वजनिक ठिकाणी, सरकारी तसेच खाजगी कार्यालयात अत्यंत उपयुक्त आहे. यासोबत त्याने शस्त्र घेऊन कुणी व्यक्ती येत असेल तर ते डिटेक्स करणे आणि सायरन वाजणे यासारखे सॉफ्टवेअर तयार केले आहे. हे दोन्ही सॉफ्टवेअर अत्यंत उपयुक्त आहे. त्याला मोठी भरारी घ्यायची आहे. मात्र, यासाठी त्याला गरज आहे ते योग्य मार्गदर्शन आणि पाठबळाची.

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com