संतापजनक! ३ नराधमांचा पती आणि मुलांसमोर महिलेवर अत्याचार

मजुर कुटुंबातील महिलेवरती तीन नराधमांनी त्या महिलेच्या पती आणि मुलांसमोरच तिच्यावरती सामूहिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे.
संतापजनक! ३ नराधमांचा पती आणि मुलांसमोर महिलेवर अत्याचार
Andhra Pradesh crime news UpdatesSaam TV

आंध्र प्रदेश : रेल्वे स्थानकामधील बाकावर झोपलेल्या मजुर काम करणाऱ्या एका कुटुंबातील महिलेवरती तीन नराधमांनी त्या महिलेच्या पती आणि मुलांसमोरच तिच्यावरती सामूहिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. ही संतापजनक आणि धक्कादायक घटना आंध्र प्रदेश मध्ये घडली आहे. (Andhra Pradesh crime news Updates)

आंध्र प्रदेशातील (Andhra Pradesh) प्रकाशम जिल्ह्यातील एक महिला आपल्या पती आणि मुलांसह रात्रीच्या वेळी रेपल्ले रेल्वे स्टेशनमध्ये एका रेल्वेतून उतरले. मात्र, त्यांना मध्यरात्रीची वेळ असल्यामुळे रेल्वे स्थानकातून पुढच्या प्रवासाला जाण्यासाठी वाहन मिळालं नाही त्यामुळे त्यांनी रेपल्ले रेल्वे स्थानकातील (Railway Station) प्लॅटफॉर्मवरील बाकावर झोपले असता रात्री एकच्या सुमारास तिघेजण दारूच्या नशेत त्यांच्याजवळ आले त्यांनी पीडितेकडील पैसे हिसकावून घेऊन तिच्या नवऱ्यालाही मारहाण केली.

हे नराधम एवढ्यावरच न थांबता त्यांनी महिलेच्या केसांना धरून तिला ओढत घेऊन गेले आणि तिच्यावर बलात्कार केला असल्याची धक्कादायक माहिती बापटला जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक वकुल जिंदाल यांनी दिली.

Andhra Pradesh crime news Updates
विद्यार्थीनीकडून शरीरसुखाची मागणी करणारा 'तो' प्राध्यापक फरार

तसंच पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिलेचा पती आरोपींकडे मदतीची याचना करत होता, मात्र त्याचा काहीही परिणाम त्यांच्यावर झाला नाही. दरम्यान, पीडितेचा पतीने रेल्वे स्टेशनबाहेर धाव घेत जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन त्यांने पोलिसांची मदत घेतली, पोलीस रेल्वे स्टेशनला पोहोचेपर्यंत आरोपी फरार झाले होते. मात्र, पोलिसांनी गुन्हा दाखल करून श्वानपथकाच्या मदतीने काही तासांतच या तिन्ही नराधम आरोपींना अटक केली. विजयकृष्ण वय वर्ष २४, निखिल वय वर्ष २५ अशी दोन आरोपींची नावे असून तिसरा आरोपी अल्पवयीन असून त्याच्यावर यापूर्वीही चोरीचे गुन्हे दाखल आहेत.

Edited By - Jagdish Patil

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.