Solapur Fire : नई जिंदगी परिसरात भीषण आग; दाेन दुकाने जळून खाक, लाखाेंचे नुकसान

या आगीत दाेन्ही दुकानातील संपुर्ण साहित्य जाळून खाक झाले आहे.
solapur fire news, solapur
solapur fire news, solapursaam tv

Solapur Fire News : सोलापूरात (solapur) भीषण आगीची घटना घडली आहे. दाेन रेडिमेड कपड्यांच्या दुकानांना आगीची माेठी झळ बसली आहे. या भीषण आगीत दोन्ही दुकाने जळून खाक झालीत. (Breaking Marathi News)

solapur fire news, solapur
Nitesh Rane: ''उद्धव ठाकरे नामर्द''; परबांचे असं स्वागत करू की पुन्हा राणेंच्या घराकडं फिरकणार नाहीत : नितेश राणे

सोलापूर शहरातील नई जिंदगी परिसरात ही भीषण आगीची घटना घडली. जाकी सोफासेट गोडाऊन आणि अरबाज कपड्यांचे दुकान या दाेन ठिकाणी आग लागली हाेती. या आगीत दाेन्ही दुकानातील (shop) संपुर्ण साहित्य जाळून खाक झाले आहे.

solapur fire news, solapur
Buffalo Birthday : बर्थडे आहे रेड्याचा...दीड टन वजन, ५० लाख किंमत; 'गजेंद्र'च्या वाढदिवसाची तुफान चर्चा

ही आग विझविण्यासाठी तीन अग्निशमन दलाच्या गाड्या लागल्या. या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. परंतु आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. दरम्यान चार दिवसांपुर्वीच सोलापूर शहरातील दत्तनगर येथील शिवमहेश्वरी मंदिराजवळील दाेन कपड्यांच्या कारखान्यांना भीषण आग लागली हाेती. त्यातही दाेन्ही कारखाने जळून खाक झाले हाेते.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com