बनावट नोटांचा छापखाना सापडला

Fake currency
Fake currency

अहमदनगर ः काही दिवसांपूर्वी तीन चोरट्यांनी टाकळी ढोकेश्वर येथील एटीएम मशिन चोरण्याचा प्रयत्न केला होता. तीन आरोपींना पोलिसांनी २४ तासांत अटकही केली होती. त्यांतील एक आरोपी विकास रोकडे हा बनावट नोटा छापत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी त्याच्या राहत्या घरी झडती घेतली. नोटा छापण्याचे साहित्य पोलिसांनी तेथून ताब्यात घेतले आहे.

या बाबत माहिती अशी ः मागील आठवड्यात टाकळी ढोकेश्वर येथील स्टेट बँकेचे एटीएम मशिन चोरण्याचा प्रयत्न तीन चोरट्यांनी केला होता. ते चोरटे पोलिसांनी अवघ्या २४ तासांत जेरबंद केले होते. त्यांतील एक आरोपी विकास रोकडे (वय १९, रा. वडगाव सावताळ) हा बनावट नोटा छापत असल्याचा सुगावा पोलिसांना लागला होता. Mastermind arrested in Parner taluka

Fake currency
राष्ट्रीय महामार्गावर तुमच्यावरही पडते का अशी "टोलधाड"

सध्या एटीएम चोरीचा तपास सुरू असताना तपासी अधिकारी पोलिस उपनिरीक्षक हनुमान उगले यांनी आरोपीच्या वडगाव सावताळ येथील घराची झडती घेतली. त्या वेळी रोकडेच्या घरात पाचशे व शंभर रुपयांच्या बनावट चलनी नोटा सापडल्या, तसेच रंग, छपाई यंत्र व कागद, कटर, कात्री आदी साहित्य मिळून आले. हे साहित्य पोलिसांनी जप्त केले आहे. नोटा छापण्याच्या कामात त्याचे आणखी कोण साथीदार आहेत, याचा शोध पोलिस घेत आहेत.

आरोपी सराईत गुन्हेगार असल्याने, त्याने छापलेल्या नोटा कोठे दिल्या, याची विचारपूसही पोलिसांनी सुरू केली आहे. कोणाची बनावट चलनी नोटांद्वारे फसवणूक झाली असेल, तर संबंधितांनी पारनेर पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. पोलिस निरीक्षक घनशाम बळप यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक उगले तपास करीत आहेत.Mastermind arrested in Parner taluka

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com