Jalna: मित्राच्या वाढदिवसाला तलवार घेऊन नाचले, अन बाराच्या भावात गेले

नाचणाऱ्या 4 जणांना अटक, सदर बाजार पोलिसांची कारवाई
Jalna: मित्राच्या वाढदिवसाला तलवार घेऊन नाचले, अन बाराच्या भावात गेले
Jalna: मित्राच्या वाढदिवसाला तलवार घेऊन नाचले, अन बाराच्या भावात गेलेSaam Tv

जालना : मित्राच्या वाढदिवसाला हातात तलवार घेऊन मोकळ्या जागेत नाचणाऱ्या 6 जणांवर सदर बाजार पोलिसांनी कारवाई केली आहे. यापैकी ४ जणांना अटक करून, त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २ तलवारी घटना स्थळावरून जप्त करण्यात आले आहेत. जालन्यातील भीमनगर भागात ही कारवाई करण्यात आली आहे.

हे देखील पहा-

पोलीस पेट्रोलिंग करत असताना काही जण मित्राच्या वाढदिवसाला तलवार हातात घेऊन, आळीपाळीने नाचत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी भीमनगर भागात जाऊन ही कारवाई केली आहे. हातात तलवार घेऊन नाचणाऱ्या ६ पैकी ४ जणांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आरोपींना न्यायालयात हजर केलं असता, त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस करत आहे.

Edited By- Digambar Jadhav

Related Stories

No stories found.