''जे हात भोंगे आणि लाऊडस्पीकर काढायला येतील ते परत जाणार नाहीत''

राज ठाकरेंच्या औरंगाबादच्या सभेनंतर आता मुस्लीम समाजातून प्रतिक्रिया यायला लागल्या आहेत.
''जे हात भोंगे आणि लाऊडस्पीकर काढायला येतील ते परत जाणार नाहीत''
Maulana Daulat Nadvi - Raj Thackeray Saam TV

नाशिक: राज ठाकरेंच्या औरंगाबादच्या सभेनंतर आता मुस्लीम समाजातून प्रतिक्रिया यायला लागल्या आहेत. ऑल इंडिया इमाम कॅऊन्सिल चे स्टेट रेसिडेंट मौलाना दौलत नदवी यांनी राज ठाकरेंना खडे बोल सुनावले आहेत. राज ठाकरे आणि त्यांचे एकूण चालणारे हे आमच्या पायाखालच्या धुळी समान आहे. संपूर्ण मुस्लिम समाज याकडे लक्ष देत नाहीत. आणि तसे काही असल्यास त्याचे उत्तर देखील काय द्यायचे ते आम्हाला माहिती आहे असे दौलत नदवी म्हणाले आहेत. राज ठाकरेंनी कितीही अल्टीमेटम दिले तरी मुस्लिम समाज भोंगे उतरवणार नाही. राज ठाकरेंची हैशियत नाही की ते कोणत्याही धर्माचा लाऊडस्पीकर, भोंगे काढतील.

जे हात भोंगे आणि लाऊडस्पीकर काढायला जातील त्यांचे ते हात परत येतील का? याची काळजी त्यांनी घेणे गरजेचे आहे. देवाने दिलेले दोघा हातांचा उपयोग खाण्यापिण्यासाठी करावं असेही नदवी म्हणाले आहेत. राज ठाकरे हे कोण आहेत या देशात कायदा नाही का? घटना , संविधान नाही का? राज ठाकरेंचे राज या देशांत चालणार आहे का? त्यांना ते उतरवायचे तर त्यांनी न्यायालयात जावे. राज ठाकरे यांच्या बोलण्याकडे जास्त लक्ष देण्याची गरज नाही. हिंदूंचे लीडर दाखवून देण्यासाठी मुस्लिम समाजाला राज ठाकरे टारगेट करत असल्याचे दौलत नदवी म्हणाले आहेत.

Edited By: Pravin Dhamale

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.