Maval News: जुन्या मुंबई पुणे रोडवर रोजच ट्राफिक जाम; पोलीस मात्र पावत्या फाडण्यात मग्न

जुन्या मुंबई पुणे रोडवर रोजच ट्राफिक जाम; पोलीस मात्र पावत्या फाडण्यात मग्न
Maval News
Maval NewsSaam tv

मावळ : मुंबई– पुणे जुन्या हायवेवरील वडगाव फाटा येथे रोजच ट्राफिक जाम असते. विशेष म्‍हणजे येथे पोलिस (Police) हजर नसतात. पोलिस असले तरी ते पावत्‍या फाडण्यात मग्न असल्‍याचे चित्र येथे पहावयास मिळते. (Breaking Marathi News)

Maval News
Latur News: लातूर जिल्हाधिकारी कार्यालयात २३ कोटीचा अपहार; वेशांतर करत पोलिसांनी घेतले ताब्यात

चाकणकडून येणारा रोड, उर्से टोलनाक्यावर येणाऱ्या रोड, पुण्यावरून मुंबईला जाणारा जुना महामार्ग याच वडगाव फाट्यावरून जातो. एवढ्या मोठ्या वर्दळीच ठिकाण असलेला हा वडगाव फाटा आहे. मात्र इथे पोलीसही फाट्यावर नसतात, तर वार्डनही नसतात. पोलीस चौकी मात्र मोकळीच असते.

Maval News
Hingoli News: दहा मिनिटाच्या वादळाने हाहाकार; झाडे गाड्यांवर पडली, रस्ते झाले जाम

वार्डन पोलीस बाजूला असलेल्या चहाच्या टपरीमध्ये बसतात आणि तिथून वाहनावर लक्ष ठेवतात. फक्त पावत्या पाडण्यात मग्न असलेले गार्डन आणि पोलीस यांच फाट्यावर जाम होत असलेल्या वाहतुकीकडे (Traffic Police) दुर्लक्ष होतानाचे चित्र रोजच बघायला मिळते. वडगाव फाट्यावर असलेली ही पोलीस चौकी फक्त झोपायसाठीच आहे का असा प्रश्न आता नागरिक विचारत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com