सेल्‍फीच्‍या नादात बुडाला; २७ तासानंतर मिळाले युवकाचे शव

सेल्‍फीच्‍या नादात बुडाला; २७ तासानंतर मिळाले युवकाचे शव
Maval
MavalSaam tv

मावळ : सेल्फी काढताना कुंडमळा महाविद्यालयीन विद्यार्थी पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला होता. त्यानंतर शोधकार्य केल्‍यानंतरही त्‍या विद्याथ्‍र्याची बॉडी मिळून आली नव्‍हती. परंतु, सत्तावीस तासानंतर त्‍याची बॉडी मिळाली. (maval news Drowned in the of selfie The body of the youth was found after 27 hours)

मावळमधील कुंडमळा परिसरात फिरायला आलेल्या महाविद्यालयीन मुलांपैकी एक जण सेल्फी काढताना पाण्यात पडला होता. तो पाण्याच्या प्रवाहासोबत वाहत गेल्याची घटना घडली होती. इंदिरा कॉलेज ताथवडे येथील सहा विद्यार्थी कुंडमळा येथे फिरायला आले होते. याठिकाणी सेल्फी घेत असताना आदर्श मिश्रा (वय 18) हा विद्यार्थी पाण्यात पडून वाहून गेला होता. मात्र सत्तावीस तास तळेगाव एमआयडीसी पोलिस, रेस्कू पथक, रक्षक मावळ व शिवदुर्ग मित्र लोणावळा टिमने परिश्रम घेत त्याची बॉडी शोधून काढली आणि पोलिसांच्या स्वाधीन केली. पुढील तपास एमआयडीसी पोलिस करीत आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com