हिंदू- मुस्लिम एकतेचे प्रतिक; एकत्रित येत साजरी केली ईद

हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतिक; एकत्रित येत साजरी केली ईद
हिंदू- मुस्लिम एकतेचे प्रतिक; एकत्रित येत साजरी केली ईद
EidSaam tv

मावळ : मशिदीवरील भोंग्यावरून राजकारण सुरू आहे. मात्र मावळमधील देहूरोडमध्ये हिंदू– मुस्लिम एकत्रित येऊन बासी ईद (Eid) साजरी केली. हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतिक यानिमित्‍ताने पहावयास मिळाले. (maval news Hindu Muslim unity Coming together to celebrate Eid)

Eid
दुर्देवी..पोहण्यासाठी गेलेल्‍या तरूणाचा बुडून मृत्‍यू

मशिदीच्या भोंग्यावरून राज्यात राजकारण सुरु आहे. अजान पठन करण्यास भोंग्यांची काय गरज? असे म्हणत राज्यभर मनसेचे (MNS) कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले आहेत. मात्र याच वेळी देहूरोडमध्ये हिंदू– मुस्लिम ऐक्याचे दर्शन घडले असून सर्व जाती धर्माच्या नागरिकांनी एकत्र येत शिरखुरम्याचे आयोजन देहूरोडच्या (Maval News) महात्मा फुले भाजी मंडईत केले. या सर्वांनी मिळून 200 लिटर दुधाचे मिश्रण करत त्यात जातीपातीचा गोडवा मिसळला.

५० वर्षाची परंपरा

देहूरोडला मिनी इंडिया संबोधले जाते. कारण काश्मीर ते कन्याकुमारीचे सर्व जाती धर्माचे लोकं गुण्यागोविंदाने राहतात. त्याच ऐक्याचे दर्शन पुन्हा एकदा घडलेय. गेली 50 वर्षाची परंपरा आज ही अबाधीत राखत बासी ईदच्या दिवशी शीर खुरम्याचे औचित्य साधून देहूरोडच्या महात्मा फुले भाजी मार्केटमधील भाजी विक्रेत्यांनी याचे आयोजन केले.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.