हिंदू मुस्लीम ऐक्याचे प्रतिक; हजरत अनगड शाह बाबा दर्गावर मानाची आरती

हिंदू मुस्लीम ऐक्याचे प्रतिक; हजरत अनगड शाह बाबा दर्गावर मानाची आरती
Tukoba Palkhi
Tukoba PalkhiSaam tv

मावळ : जगतगुरु संत तुकाराम महाराज यांची पालखी इनामदार वाड्यातुन पंढरपूरकडे मार्गस्थ झाल्यानंतर साडे तिनशे वर्ष जूनी पंरपंरा असलेल्या हिंदू- मुस्लीम एक्याचे प्रतिक असलेले (Ashadhi Wari) हजरत अनगड शाह बाबा दर्गावर मानाची पहिली आरती झाली. तसेच काही वेळासाठी पालखी विसावाही करण्यात येतो. लाखो वारकऱ्यांच्या साक्षीने संपन्न झालेल्या या दर्गाहवरील पालखीच्या आरती (Maval) सोहळ्यात लाखो हिंदू-मुस्लीम भाविकांच्या डोळ्याचे पारणे फेङले. या पारंपरिक सोहळ्यानंतर देहुतील ग्रामस्थांनी पाणावलेल्या डोळ्यांनी तूकाराम महाराजांच्या पालखीला निरोप दिला. (maval news Hindu Muslim unity tukoba palkhi Aarti at Hazrat Angad Shah Baba Dargah)

संत तुकाराम महाराज आणि अनगडशहा बाबा यांचे मैत्रीचे नाते होते. पालखी इनामदार वाड्यातून निघाल्यानंतर प्रथम अभंग आरती अनगड शहा बाबा यांच्या दर्ग्यात केली जाते. तुकाराम महाराजांचे भेटीसाठी अनगडशहा बाबा पुण्यातून देहूत आले होते. बाबांकडे एक कटोरा होता; तो कितीही भिक्षा मागितली तरी भरत नव्हता. मात्र तुकाराम महाराजांच्या घरी गेल्यानंतर तुकाराम महाराज यांची मुलगी भागीरथी यांनी ओंजळभर टाकलेल्या पीठाने कटोरा भरला. त्यानंतर तुकाराम महाराज आणि अंगडशहा बाबा यांच्यात मैत्री झाली. त्यानंतर महाराजांनी बाबांना विनंती केली की तुम्ही देहूत रहा आणि त्यांना जागा नाही दिली. त्यानंतर जेव्हा ही तुकाराम महाराजांची पालखी पंढरपूरकडे प्रस्थान होते. त्यावेळेस पहिला विसावा हा अनगडशहा बाबा यांच्या दर्ग्यावर थांबून आरती केले जाते.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com