Ashadhi Wari: दोन वर्षांच्या खंडानंतर तुकोबांच्या पालखीचे पंढरीकडे प्रस्थान

दोन वर्षांच्या खंडानंतर तुकोबांच्या पालखीचे पंढरीकडे प्रस्थान
Ashadhi Wari: दोन वर्षांच्या खंडानंतर तुकोबांच्या पालखीचे पंढरीकडे प्रस्थान
Ashadhi WariSaam tv

मावळ : पंढरपुरीच्या सावळ्याच्या भेटीची आस लागलेल्या लाखो वैष्णवांच्या भक्‍ती कल्लोळात जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या 337 व्या पालखी सोहळ्याने आज पंढरपूरकडे प्रस्थान केले. कोरोना (Corona) महामारीच्या दोन वर्षांच्या खडतर कालखंडानंतर तुकाराम..तुकाराम असा अखंड घोष अन् टाळ मृदंगाचा गजर करीत यावर्षी वैष्णवांनी प्रस्थान सोहळ्यात हरिभक्‍तीचे रंग भरले. (maval news Tukoba palakhi leaves for Pandharpur after a two year)

कोरोनाच्या दोन वर्षांच्या कठोर निर्बंधांमुळे पंढरीची वारी (Ashadi Wari) आणि वैभवी पालखी सोहळ्यापासून दूर असलेल्या वारकऱ्यांमध्ये यंदा पंढरीच्या वाटेवर चालण्यासाठी उत्साह दिसून येत आहे. दोन वर्षांच्या खंडानंतर पुन्हा भक्तिचैतन्याचा संग मिळणार असल्याने आनंद व्यक्त होत आहे. संतांच्या पालख्यांसोबत लाखो वारकरी पंढरीच्या वाटेवर निघाले आहेत. कोरोना महामारीच्या दोन वर्षाच्या खडतर कालखंडानंतर यंदाची पायी वारी मोकळ्या वातावरणात होत आहे. राज्य सरकारने सर्व निर्बंध उठवित यंदा पालखी सोहळ्याला परवानगी दिली. त्यामुळे समस्त वैष्ववजणांमध्ये मोठा उत्साह, आनंदाचे वातावरण आहे. सकाळी आठ वाजता पालखी इनामदार वाड्यातून निघून पिंपरी चिंचवड शहराकडे प्रस्थान झाली. आज आकुर्डीमधील विठ्ठल मंदिरात तिचा मुक्काम असणार आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com