मावळात सत्तर टक्के जनावरांना लंपी रोगाची लागण

मावळात सत्तर टक्के जनावरांना लंपी रोगाची लागण
मावळात सत्तर टक्के जनावरांना लंपी रोगाची लागण
लंपी

मावळ (पुणे) : मावळात अनेक भागांत लंपी त्वचारोगाने जनावरे बेजार झाली आहे. अंगावर गाठी येवून फोड येणे, फोड फुटल्यावर जखम होणे, ताप येणे. चारा न खाणे त्यामुळे जनावरांची प्रतिकार शक्ती कमी होत आहे. मावळमध्ये बावन्न हजार पशुधन असून सत्तर टक्के जनावरांना हा लंपी रोग झाला आहे. (mawal-news-Seventy-percent-of-the-animals-in-Mawla-are-infected-with-Lampi-disease)

राज्यासह मावळात कोरोनाने थैमान घातले होते. तो कुठेतरी आटोक्यात येण्याच्या मार्गावर येत आहे. तर मावळमध्ये जनावरांवर लंपी रोगाने प्रहार केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. जनावरांच्या दूध उत्पादनावर याचा परिणाम होत आहे. त्यातच पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची संख्या कमी आहे. त्यामुळे गुरांना उपचार करण्यास विलंब लावत आहे. मावळ मधील दहा गावात एक पशुवैद्यकीय अधिकारी आहे. प्रत्येक गावात पोहोचणे त्यांना अशक्य झालेले आहे. त्यातच हा रोग वाढत आहे. लंपी रोग झालेल्या जनावरांना वेगळे बांधावे लागते त्याला वेगळ्या चारा द्यावे लागतील.

विषाणूजन्य रोग

लंपी हा रोग विषाणूजन्य रोग आहे. शेळ्या मेंढ्यांमध्ये जो दिव्यारोग आढळतो. त्याचप्रमाणे हा रोग आहे. कोरोना रोगाला जसे परफेक्ट औषध नाही; त्याप्रमाणे या रोगाला ही औषध नाही. मात्र जनावरांची प्रतिकार शक्ती वाढवण्याची अँटिबायोटिक औषधे दिली तर हा रोग आटोक्यात येऊ शकतो. लंपी हा विषाणूजन्य रोग असल्याने याचा त्याला रोग होऊ नये याची काळजी घ्यावी लागते.

अशी घ्या काळजी

मावळात अनेक ठिकाणी लंपीबाबत जनजागृती करून लसीकरण करण्यात आले. परंतु लसीकरण होऊनही अनेक जनावरांना हा आजार झाला आहे. हा लंपी रोग आटोक्‍यात यावे यासाठी जनावरांचा गोठा स्वच्छ ठेवावे लागते. गोठ्यात पाणी साचू देऊ नये याची काळजी घ्यावी लागते. लंपी आजारापासून संरक्षण बाधित जनावरे वेगळी बांधावीत.प्रसार बाह्य कीटकांद्वारे होत असल्याने आजारी नसलेल्या जनावारांना गोठ्यात डास, माश्या, गोचीड आदींचे प्रमाण कमी करण्यासाठी आवश्यक औषधांची फवारणी करावी.

तरुण शेतकरी आले पुढे

अशातच पवन मावळातील काही तरुण शेतकरी पुढे सरसावले आहेत. ते स्वतः या लसीबाबत पशुवैद्यकीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली लसीकरण मोहीम राबवत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना कुठं तरी दिलासा मिळत आहे. मुख्यतः गाई, बैल या जनावरांना हा आजार रोग होऊ शकतो. परंतु लहान वयाच्या जनावरांना याचा संसर्ग होण्याची शक्यता जास्त असते. एखादा जनावर दगावला तर शासनाकडून त्वरित शेतकऱ्यांना पंधरा हजार रुपयांचे अनुदान देणार आहे.

लंपी
दोन्‍ही मुलांनी मिळून केला जन्‍मदात्‍याचा खून; दवाखान्‍यात जाण्याचे किरकोळ कारण

लंपी आजाराची लक्षणे

लंबी हा रोग विषाणूजन्य आजार असल्याने बाधित जनावरे अशक्त होतात. जनावरांची दूध उत्पादन क्षमता घटते. प्रजनन क्षमतेवरही विपरित परिमाण. जनावरांच्या सर्व शरीरावर कडक व गोल आकाराच्या गाठी येतात. या गाठी साधारणपणे पाठ, पोट, पाय व जननेंद्रिय आदी भागात येतात. बाधित जनावरांच्या डोळ्यातून आणि नाकातून पाणी येते. तोंडातील व्रणामुळे आजारी जनावरांना चारा खाण्यास त्रास होतो. पायावरील गाठींमुळे जनावरांना चालताना त्रास होतो.

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com