अट्टल गुन्हेगाराच्या मदतीने पाेलिसांचा औषध दुकानावर छापा

अट्टल गुन्हेगाराच्या मदतीने पाेलिसांचा औषध दुकानावर छापा
प्रातिनिधिक छायाचित्रSaam Tv news

सांगली : वैद्यकीय अधिका-यांच्या चिठ्ठी शिवाय औषध विक्रेत्यांनी गोळ्या देऊ नये असे आवाहन पाेलिस दलाने नुकतेच केले होते. तरी देखील काही विक्रेते आपल्या दुकानातून युवकांना गोळ्यांचा पुरवठा करत असल्याची तक्रार पाेलिसांपर्यंत पाेहचली. या गाेळ्यांचे सेवन नशा करण्यासाठी हाेत असल्याची खात्रीशिर माहिती उपलब्ध झाल्यानंतर पाेलिसांनी सापळा रचून एका विक्रेत्यास पडकले. त्याची चाैकशी करुन अन्न व औषध प्रशासनला कारवाई करण्याच्या सूचना केल्या आहेत.

नशा येईल अशा प्रकारच्या गोळ्यांचे सेवन करून युवक दिवसभर दंगा घालत असल्याचे तक्रारी सातत्याने पाेलिसांच्या कानावर पडत असतं. त्यामुळे या विरोधात पोलिसांनी धडक मोहीम राबविण्यास प्रारंभ केला. वैद्यकीय अधिका-यांच्या चिठ्ठी शिवाय गोळ्या देणा-यांविराेधात देखील माेहीम आखण्यात आली.

एका अट्टल गुन्हेगारास नुकतेच पकडल्यानंतर त्याची चाैकशी केली असता त्याच्याकडे काही गोळ्या सापडल्या. या गाेळ्या त्याने सांगली मिरज रस्त्यावरील एका औषध दुकानातून घेतल्याचे सांगितले. medical-owner-arrested-sangli-police-miraj-crime-news-sml80

प्रातिनिधिक छायाचित्र
दाेन पदक जिंकणारी पहिली महिला भारतीय खेळाडू ठरली अवनी लेखरा

संबंधितास पुन्हा त्याच दुकानात पाठवून गोळ्या आणण्यासाठी पाेलिसांनी पाठविले. त्यानंतर दुकानाबाहेर पोलिसांनी सापळा रचला. चिठ्ठी शिवाय औषध विक्रेत्याने ४० गोळ्या दिल्याने पोलिसांनी छापा टाकून दुकानदारास रंगेहात पकडले आणि ताब्यात घेतले. पुढील कार्यवाहीसाठी अन्न व औषध प्रशासनला अहवाल देत त्याच्यावर कारवाई करण्याच्या सूचना पाेलिसांनी केल्या आहेत.

edited by : siddharth latkar

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com